एक्स्प्लोर

Sri Lanka Crisis : श्रीलंकेची भारताकडे मदतीची हाक, मागितली 55 मिलियन डॉलरची मदत

Economic Crisis In Sri Lanka : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. आता श्रीलंकेनं भारताकडे युरिया खरेदी करण्यासाठी 55 मिलियन डॉलरची मदत मागितली आहे.

Sri Lanka Seeks Loan From India : श्रीलंकेतील आर्थिक संकट (Economic Crisis) आणखी गडद झालं आहे. यामुळे खाद्य संकटही (Food Crisis) उत्पन्न झालं आहे. श्रीलंकेनं आता भारताकडे मदतीचा हाक दिली आहे. श्रीलंकेनं खत खरेदी करण्यासाठी भारताची मदत मागितली आहे. युरिया खरेदी करण्यासाठी श्रीलंकेनं भारताकडे 55 मिलियन अमेरिकन डॉलरची (55 Million USD) मदत मागितली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी अलिकडेच आर्थिक संकटामुळे आगामी काळात मोठ्या अन्न संकटाचा सामना करावा लागण्याची भीती आणि इशारा दिला होता. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत शेतीसाठी लागणाऱ्या युरिया खरेदीसाठी मंत्रिमंडळाने एक करार (Agreement) तयार केला आहे. या करारावर अद्याप पंतप्रधानांची स्वाक्षरी झालेली नाही.

श्रीलंका सरकारने सांगितलं आहे की, भारताने श्रीलंकेला इंपोर्ट-एक्सपोर्ट बँकेकडून 55 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याचं मान्य केलं आहे. हे कर्ज 2022-23 हंगामासाठी युरिया खरेदीसाठी वापरण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी सांगितलं की, सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली तर येत्या पाच ते सहा महिन्यांत अन्नाच्या सध्याच्या टंचाईवर मात करता येईल.

'गोटाबाया राजपक्षे कृषी संकटाला जबाबदार'

श्रीलंकेतील कृषी संकटासाठी गोटाबाया राजपक्षे यांना जबाबदार धरलं जात आहे. त्यांनीच देशात रासायनिक खतांच्या आयातीवर बंदी घातली होती, त्यामुळे आज देशातील कृषी क्षेत्रातील 50 टक्के पिकांचं नुकसान होत आहे. राजपक्षे यांच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. पण राजपक्षे सरकारने आम्ही देशात सेंद्रिय खत वापरणार असून हरित शेती धोरणासाठी छोटासा प्रयत्न असल्याचं सांगत त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

श्रीलंकेत स्वातंत्र्यानंतरची सर्वात वाईट आर्थिक परिस्थिती

ब्रिटीशांपासून 1945 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे अन्न, औषध, स्वयंपाकाचा गॅस, इतर इंधन, टॉयलेट पेपर आणि अगदी माचिस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना इंधन आणि स्वयंपाकाचा गॅस घेण्यासाठी तासनतास रांगेत थांबावं लागत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Embed widget