Environmental Performance : पर्यावरण निर्देशांकात 180 देशांमध्ये भारत सर्वात खालच्या क्रमांकावर, इतर देशांची स्थिती जाणून घ्या
India Lowest Rank : यूएस-आधारित संस्थांच्या निर्देशांकात भारत 180 देशांमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
Environmental Performance : पर्यावरणीय कामगिरीच्या (Environmental Performance) बाबतीत, यूएस-आधारित(America) संस्थांच्या निर्देशांकात भारत 180 देशांमध्ये सर्वात खालच्या (Lowest Rank) क्रमांकावर आहे. येल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल लॉ अँड पॉलिसी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इंटरनॅशनल अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन नेटवर्क द्वारे नुकत्याच प्रकाशित झालेल्या 2022 एनव्हायर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स (EPI) मध्ये डेन्मार्क अव्वल आहे. यानंतर ब्रिटन आणि फिनलंडला स्थान मिळाले आहे. या देशांना अलिकडच्या वर्षांत हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
या देशांना मिळाले सर्वाधिक गुण
EPI जगभरातील पर्यावरणाच्या स्थितीचा डेटा-आधारित आकडेवारी सादर करतो. EPI 11 श्रेणींमध्ये 40 कामगिरी निर्देशांक वापरून हवामान बदल कामगिरी, पर्यावरणीय आरोग्य आणि इकोसिस्टम स्थितीवर आधारित 180 देशांचे गुणांकन करते. अहवालात म्हटले आहे की, भारत (18.9), म्यानमार (19.4), व्हिएतनाम (20.1), बांगलादेश (23.1) आणि पाकिस्तान (24.6) यांना सर्वात कमी गुण मिळाले आहेत. तर चीन 28.4 गुणांसह 161 व्या क्रमांकावर आहे.
भारत प्रथमच क्रमवारीत घसरला
कमी गुण मिळवणाऱ्या बहुतेक देशांनी पर्यावरणापेक्षा आर्थिक वाढीला प्राधान्य दिले आहे, यामुळे ते इतर संकटांना तोंड देत आहेत. त्यात म्हटलंय की, वाढत्या धोकादायक हवेची गुणवत्ता आणि वेगाने वाढणारे ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन यामुळे भारत प्रथमच क्रमवारीत तळाशी घसरला आहे. संशोधकांचा दावा आहे की उत्सर्जन वाढ रोखण्यासाठी चीन आणि भारत 2050 मध्ये ग्रीनहाऊस गॅसचे सर्वात मोठे आणि दुसऱ्या क्रमांकाचे उत्सर्जक होण्याचा अंदाज आहे.
केवळ डेन्मार्क, ब्रिटनने राखली लाज
पश्चिमेकडील 22 श्रीमंत लोकशाहींमध्ये अमेरिका 20 व्या क्रमांकावर आहे आणि एकूण यादीत 43 व्या क्रमांकावर आहे. EPI अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजनांपासून माघार घेतल्यामुळे या देशाची कमी रँकिंग आहे.
रशिया 112 व्या क्रमांकावर
चीन, भारत आणि रशियासारख्या प्रमुख देशांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन वेगाने वाढत आहे आणि इतर अनेक देश चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. EPI अंदाज सूचित करतात की, जर सध्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर 2050 मध्ये केवळ चार देश - चीन, भारत, अमेरिका आणि रशिया - 50 टक्क्यांहून अधिक जागतिक ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनासाठी जबाबदार असतील.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा. बोर्डाकडून बारावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- HSC Result 2022 Date : आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार
- HSC Result 2022 Date : बारावी बोर्डाचा निकाल; यंदा एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?