(Source: ECI/ABP News/ABP Majha)
corona vaccine | ऑक्सफर्डची लस 70 टक्के प्रभावी, क्लिनिकल ट्रायलनंतर कंपनीचा दावा
corona vaccine | ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कोरोना लस निर्मिती कंपन्यांची लस जवळपास 70 टक्के प्रभावित असल्याची संशोधनातून समोर आलंय. पुढच्या वर्षाअखेरपर्यंत जगामध्ये 3 अब्ज डोस उपलब्ध करुन देणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आलंय.
Oxford Vaccine: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना एक दिलासादायक बातमी आली आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कोरोना लस निर्मिती कंपन्यांची लस जवळपास 70 टक्के प्रभावित असल्याची संशोधनातून समोर आलंय. एका टप्प्यात देण्यात आलेली ही लस 90 टक्के प्रभावी ठरली आणि महिन्याभराच्या अंतराने देण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात 62 टक्के प्रभावी असल्याची दिसून आले आहे. या दोन्हीची सरासरी काढल्यास ही लस 70.4 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले.
ही गोष्ट कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये मैलाचा दगड असल्याचे ऑक्सफर्डने म्हटले आहे. तसेच याचा प्रभाव 90 टक्क्यांपर्यंतही वाढू शकतो असं ऑक्सफर्डने दावा केला आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनेका यांच्या भागिदारीतून पुढच्या वर्षअखेरपर्यंत जगामध्ये 3 अब्ज डोस उपलब्ध करुन देणार असल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आलंय.
I am delighted to hear that, Covishield, a low-cost, logistically manageable & soon to be widely available, #COVID19 vaccine, will offer protection up to 90% in one type of dosage regime and 62% in the other dosage regime. Further details on this, will be provided this evening. https://t.co/KCr3GmROiW
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) November 23, 2020
ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपन्यांच्या सहकार्याने भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) या लसीच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला कोरोनाच्या लसीच्या वापरासंबंधी आपत्कालीन मंजुरी देण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत भारतात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीची उपलब्धता सर्वप्रथम डॉक्टर्स, नर्स, पोलीस तसेच कोरोनासंबंधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या डिसेंबरच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.
ऑक्सफर्डच्या लसीची बाजारपेठेतील किंमत ही 500 ते 600 रुपये असण्याची शक्यता आहे. भारतीय लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार या लसीची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार असल्याने सरकारला ही लस 225 ते 300 रुपयाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Pfizer या औषध कंपनीने दावा केला आहे की कोविड 19 लस 90 टक्के प्रभावी आहे. एक स्वतंत्र डेटा देखरेख समितीने केलेल्या विश्लेषणानुसार, Pfizer आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी होती. ज्यांना कोरोनाची लक्षणे आधी दिसत नव्हती त्यांच्यावर ही लस प्रभावी ठरली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. तर अमेरिकेतील मॉडर्ना या कोरोना लस निर्माण करणाऱ्या कंपनीने त्यांची लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. जगभरात सध्या किमान 10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.
महत्वाच्या बातम्या: