एक्स्प्लोर

Corona Vaccine | भारतात ऑक्सफर्डची कोरोना लस अर्ध्या किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता!

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या डिसेंबरच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.देशात मार्च अखेरपर्यंत एकापेक्षा अधिक कोरोना लसी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भारतात या लसी अर्ध्या किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: आगामी नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतासाठी कोरोनाच्या लसीसंबंधी दिलासादायक बातमी मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीची उपलब्धता सर्वप्रथम डॉक्टर्स, नर्स, पोलीस तसेच कोरोनासंबंधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला कोरोनाच्या लसीच्या वापरासंबंधी आपत्कालीन मंजुरी देण्याची शक्यता आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या डिसेंबरच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. कंपनीने याआधीच तसं स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या लसीच्या खरेदीसंबंधी केंद्र सरकार लस निर्मीती कंपन्यांशी अंतिम चर्चा करत असल्याचे वृत्त आहे.

भारत सरकारला अर्ध्या किंमतीत कोरोना लस उपलब्ध होणार ऑक्सफर्डच्या लसीची बाजारपेठेतील किंमत ही 500 ते 600 रुपये असण्याची शक्यता आहे. भारतीय लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार या लसीची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार असल्याने सरकारला ही लस 225 ते 300 रुपयाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारत सरकार सर्वसामान्यांना ही लस लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहे. भविष्यात सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत या लसीचे मोफत वाटपही होण्याची शक्यता आहे.

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनलाही मंजुरी मिळण्याची शक्यता भारत बायोटेकनेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लसीच्या चाचणीचे परीक्षण पूर्ण केले आहे. यामुळे भारत बायोटेकलाही लसीच्या आपत्कालीन चाचणीसाठी मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनीतर्फे आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत बायोटेकची लस फेब्रुवारीपर्यंत बाजारात येईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मार्च अखेरीस एकापेक्षा जास्त लसींची उपलब्धता शक्य सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनमध्ये त्यांच्या लसीच्या प्रभावासंबंधी माहिती जमा केल्यानंतर भारतात त्याच्या आपत्कालीन वापरासंबंधी विनंती केल्यास केंद्र सरकार त्याला मंजुरी देण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकच्या बाबतीतही केंद्र सरकार असा विचार करु शकते. असे घडले तर मार्च अखेरपर्यंत भारतात एकापेक्षा जास्त कोरोनाच्या लसींची उपलब्धता होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget