Omicron Variant : कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी, ओमायक्रॉनचा धोका कमी : संशोधन
Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्यामध्ये एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बनावटीची कोविशिल्ड लस ओमायक्रॉन व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचं ब्रिटनमधील एका संशोधनात समोर आलं आहे.
Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron) च्या वाढत्या धोक्यामध्ये एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटवर कोणती लस अधिक प्रभावी आहे याबाबत ब्रिटनमध्ये एका संशोधन करण्यात आलं आहे. या प्रभावी लसींच्या यादीमध्ये भारतीय बनावटीची कोविशिल्ड (Covishield) लसीचाही समावेश आहे. ही आनंदाची बातमी आहे.
जगभरात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता ब्रिटनमध्ये एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात जगभरातील 7 कंपनीच्या लसींच्या बूस्टर डोस (Booster Dose) घेतलेल्या व्यक्तींमध्ये अधिक प्रतिकारक क्षमता निर्माण झाल्याचं निरीक्षणात नोंदवण्यात आलं आहे. या 7 लसींमध्ये कोविशिल्ड लसीचा समावेश आहे. ही लस ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका या भारतील कंपनीनं तयार केली आहे. भारतामध्ये कोविड लसीकरणात कोविशिल्ड लसीचा वापर सर्वात जास्त झाल्यामुळे भारतीयांसाठी ही आनंतदाची बातमी आहे.
ब्रिटनमध्ये कोविशिल्ड किंवा फायझर (pfizer) ची कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींवर संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनात लसीचे दोन डोस दिल्यानंतर बूस्टर डोस देऊन निरीक्षण करण्यात आलं. याआधीच्या संशोधनात असं सिद्ध झालं होतं की, कोविशिल्ड आणि फायजरची लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही सहा महिन्यांपर्यंत प्रतिकारक क्षमता वाढवण्यात प्रभावी आहे. अनेक लसनिर्मिती कंपन्या लसीचा बूस्टर डोस देण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, लस घेतल्यानंतर काळानुसार लसीची प्रभावीपणा कमी होतो, असंही संशोधनात समोर आलं आहे. लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस कोरोनावर किती प्रभावी आहे याबाबत अद्याप जास्त संशोधन झालेलं नाही.
कोवॅक्सिनसह 7 लस अधिक प्रभावी
गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, कोविशिल्ड (Covishield), फायझर(pfizer) , नोवावॅक्स (Novavax), जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) , मॉडर्ना (Moderna) , वलनेवा (Valneva) आणि क्योरवैक (CureVac) लसीचे बूस्टर डोस अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. या संशोधनामध्ये 2,878 ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. लस घेतल्यानंतर स्वयंसेवकांना थकवा, डोकेदुखी आणि लस घेतलेल्या हात दुखणं अशी सामान्य लक्षण जाणवली. काही व्यक्तींवर या लसीचा गंभीर दुष्परिणामही जाणवला.
डोस घेतलेल्यावरील परिणाम
संशोधनात असं समोर आलं की, डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये 10 ते 12 आठवड्यानंतर सात वॅक्सिनपैकी बूस्टर डोस दिल्यानं प्रतिकारक क्षमता वाढल्याचं समोर आलं. शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, बूस्टर डोसचा प्रभाव आगामी काळात कधीपर्यंत राहतो, याबाबत निरीक्षण सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : धक्कादायक! भारतातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाचा यंत्रणांना चकवा, दुबईला पळाला!
- Omicron Variant : भारतात ओमायक्रॉननं वाढवली धास्ती; लसीचा बुस्टर डोस आवश्यक? NITI Aayog म्हणतंय...
- Omicron Variant : ओमायक्रॉनमुळे अमेरिका सतर्क, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha