(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel-Iran Tension Row : इस्त्रायलवर इराणचा हल्ला, 200 क्षेपणास्त्र डागली, अमेरिकेतून मोठी अपडेट समोर, बायडन यांचे सैन्याला थेट आदेश
Israel-Iran Tension Row: इराणनं हिजबुल्लाह आणि हमासच्या नेत्यांच्या हत्येचा बदला म्हणून इस्त्रायलवर हल्ला केला आहे. यामुळं बायडन भडकले आहेत.
Israel Iran War वॉशिंग्टन : इस्त्रायल आणि इराण यांच्यात वादाचा भडका उडाला आहे. इराणनं इस्त्रायलवर 200 मिसाईल डागल्या आहेत. इराणं क्षेपणास्त्र हल्ला करताच इस्त्रायलमध्ये सायरन वाजू लागले. त्यानंतर सामान्य लोकांना बॉम्बरोधक ठिकाणांवर पाठवण्यात आलं. इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर अमेरिकेकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी देशातील सैन्याला आदेश देत इराणची क्षेपणास्त्र उध्वस्त करण्यास सांगितलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस येथे उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत इराणनं इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याचा आढावा घेण्यात आला. अमेरिकेनं या स्थितीवर लक्ष ठेवलं आहे. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा टीम या संदर्भात नियमितपणे अपडेट घेत आहे. जो बायडन यांनी अमेरिकेच्या सैन्याला इराणविरुद्ध इस्त्रायलची मदत करण्याचे आदेश दिले. इस्त्रायलवर हल्ला करणारी क्षेपणास्त्र देखील पाडण्याचे आदेश दिले.
इराणनं मंगळवारी रात्री इस्त्रायलवर हल्ला करत हिजबुल्लाह आणि हमासच्या नेत्यांच्या हत्येचा बदला घेतला. तेल अवीव आणि जेरुसलेम जवळ स्फोटांचे आवाज ऐकले गेले. असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार इस्त्रायलमध्ये हवाई हल्ल्यावेळी सायरन वाजू लागले, जे क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचं संकेत होते. इस्त्रायलच्या सैन्याच्या प्रवक्त्यांनी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यावेळी कमी लोक जखमी झाले असून सामान्य जनतेनं बंकरमधून बाहेर यावं, असं सांगितलं.
इस्त्रायल डिफेन्स फोर्सेसकडून सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून माहिती देण्यात आली आहे. इराणकडून जो हल्ला करण्यात आला त्यांच्या निशाण्यावर जेरुसलेममधील मुस्लीम, ख्रिश्चन आणि यहूदी लोक होते, असा दावा करण्यात आला आहे.
आयडीएफच्या दाव्यानुसार इस्त्रायलवर 200 क्षेपणास्त्र डागण्यात आली. आर्मी रेडिओच्या रिपोर्टनुसार इराणनं 200 क्षेपणास्त्र डागण्यात आली. यानंतर देशभरात सायरन वाजू लागले. इस्त्रायलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेन गुरियन येथील उड्डाणं रद्द करण्यात आली. जॉर्डनचं हवाई क्षेत्र देखील बंद करण्यात आलं. इराणनं या हल्ल्यानंतर इस्त्रायलनं प्रत्युत्तर दिल्यास आम्ही एक हजार पट अधिक हल्ला करु असा इशारा देखील दिला आहे.
पाहा व्हिडीओ:
RAW FOOTAGE: Watch as Iranian missiles rain over the Old City in Jerusalem, a holy site for Muslims, Christians and Jews.
— Israel Defense Forces (@IDF) October 1, 2024
This is the target of the Iranian regime: everyone. pic.twitter.com/rIqUZWN3zy
इतर बातम्या :
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार