China Covid Death : कोरोनाचा चीनमध्ये धुमाकूळ! एका महिन्यात तब्बल 60 हजार रूग्णांचा मृत्यू
China Covid Death : चीनमध्ये 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधील 59,938 कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या वैद्यकीय प्रशासन ब्युरोचे प्रमुख झियाओ याहुई यांनी दिली.
China Covid Death : गेल्या काही दिवसांपासून जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. चीनमध्ये तर कोरोनाने धुमाकूळच घातलाय. चीनच्या आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या एक महिन्यात चीनमध्ये तब्बल 60 हजार कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. कोरोना रूग्णांची आकडेवारी वाढू लागल्यानंतर गेल्या महिन्यात डिसेंबरच्या सुरुवातीला चीन सरकारने शिथिलता आणली होती. तरी देखील एवढ्या जणांचा मृत्यू झालाय.
चीनमध्ये 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 या कालावधील 59,938 कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या वैद्यकीय प्रशासन ब्युरोचे प्रमुख झियाओ याहुई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एका महिन्यात 60,000 मृत्यूंपैकी 5,503 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचा मृत्यू श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे झाला होता. याशिवाय 54 हजार 435 रुग्ण आहेत, ज्यांचा मृत्यू कोरोनाशिवाय व्यतिरिक्त इतर आजारांमुळे झाला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला चीनने आपले शून्य कोविड धोरण हटवले होते. त्यानंतर चीनवर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चिनी आरोग्य अधिकार्याने बुधवारी (11 जानेवारी) म्हटले होते की, अचूक संख्येवर लक्ष देणं आवश्यक नाही. बीजिंगने यापूर्वी कोविड मृत्यूचे वर्गीकरण करण्यासाठी आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा केली होती. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोजली जाईल. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने त्यावर टीका केली होती. हे फारच विचित्र असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.
डब्ल्यूएचओचे (WHO) प्रमुख टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले की, डब्ल्यूएचओ चीनमधून रुग्णालयात दाखल आणि मृत्यूंबाबत अधिक जलद, नियमित, विश्वासार्ह डेटासह "व्हायरल सिक्वेन्सिंग" सुरू ठेवत आहे. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी (14 जानेवारी) मृत्यू झालेल्यांचे सरासरी वय 80.3 वर्षे असल्याचे सांगितले. परंतु, चीनमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाखो लोकांना अद्याप लसीकरण करण्यात आलेले नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेत देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारतात देखील कोरोना रूग्णांच्या रूग्ण वाढीमुळे आरोग्य यंत्रणांनी खबरदारी घेतली आहे. कोरोनाच्या नियमांचं पुन्हा पालन करण्याचं आव्हान आरोग्य मंत्रालयाने केलं आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणांनी तशी तयारी देखील केली आहे.
महत्वाच्या बातम्या
Dhule News : 53 कोरोना मृतांकडे एक कोटी 18 हजारांचं कर्ज थकलं, मृतांचं कर्ज माफ करणार की वारसांकडून वसूल करणार? सरकार निर्णय घेणार