VIDEO: साडेतीन लाख वाहनं जागच्या जागी; ट्रॅफिक जॅममुळे भूक लागली, पठ्ठ्याने असं काही केलं...., व्हिडीओ व्हायरल
Traffic Jam Bengaluru: बंगळुरुमध्ये पाच तासांहून अधिक काळ ट्राफिक जॅम झालं असतानाच एका व्यक्तीला भूक लागते, यानंतर त्याने जे धाडस केलं ते पाहून अनेक लोक अवाक झाले आहेत.
Traffic Jam Bengaluru: सध्या कर्नाटकाच्या बंगळुरुतील (Bengaluru) ट्रॅफिक जॅमचा (Traffic Jam) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशी घटना तुम्ही याआधी कधी अनुभवलीही नसेल. बुधवारी (27 सप्टेंबर) बंगळुरुमध्ये तब्बल पाच तासांहून अधिक काळ ट्रॅफिक जॅम झालं होतं. या ट्रॅफिक (Traffic) जॅममध्ये फसलेल्या एका व्यक्तीने गाडीतच ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला.
भर ट्रॅफिकमध्ये गाडीतच ऑर्डर केला पिझ्झा
पिझ्झा डिलिव्हरी बॉय जेव्हा भर ट्रॅफिकमध्ये येऊन गाडीत पिझ्झाची डिलिव्हरी (Pizza Delivery) करुन गेला, त्यावेळी आजूबाजूचे लोक देखील चकित झाले. भर ट्रॅफिकमध्ये इतकं कुणी कसं करू शकतं? असा प्रश्न वाहतूक कोंडीत फसलेल्या अनेकांना पडला. गाडीत बसलेल्या एका मुलानेच ही घटना त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली आणि हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. अवघ्या काही मिनिटांत हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला. या व्हिडीओमागची पूर्ण कहाणी जाणून घेऊया...
नेमकं घडलं काय?
ट्विटरवर ऋषिवत्स नावाच्या मुलाने एक 30 सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बुधवारी बंगळुरुमध्ये पाच तासांहून अधिक काळ ट्रॅफिक जॅम झालं होतं, त्यात ऋषिवत्स देखील फसला होता. त्याला आणि त्याच्या मित्राला खूप भूक लागली होती, अशातच त्यांनी पिझ्झा ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅफिक जॅममध्ये ऑर्डर डिलिव्हर होऊ शकते का? हे त्यांना पाहायचं होतं.
ऋषिवत्सने डॉमिनोजमधून पिझ्झा ऑर्डर केला आणि काही मिनिटांत दोन पिझ्झा डिलिव्हरी बॉय त्यांचा पिझ्झा डिलिव्हर करण्यासाठी आले. लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंगद्वारे ते ऋषिवत्सच्या गाडीपर्यंत पोहोचले. डिलिव्हरी बॉयने बाईक पार्क केली आणि ऋषिवत्सच्या हातात पिझ्झा दिला.
When we decided to order from @dominos during the Bangalore choke. They were kind enough to track our live location (a few metres away from our random location added in the traffic) and deliver to us in the traffic jam. #Bengaluru #bengalurutraffic #bangaloretraffic pic.twitter.com/stnFDh2cHz
— Rishivaths (@rishivaths) September 27, 2023
वाहतूक कोंडीचं कारण काय?
28 ऑक्टोबरपासून 5 दिवसांची लांब सुट्टी (Long Weekend) आली आहे. यामुळे सुट्टी घालवण्यासाठी लोक बंगळुरूमधून बाहेर पडले होते, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तर, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानेही वाहतूक कोंडी झाली.
शहरांतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना दोन तास वेळ लागला. सकाळी शाळेत गेलेली मुलं रात्री 8-9 वाजेच्या सुमारास घरी परतली. शहराबाहेरील रिंग रोडवर लोक पाच ते सहा तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून होते.
हेही वाचा:
Bengaluru Traffic : बंगळुरुमध्ये मोठी वाहतूक कोंडी, सकाळी शाळेत गेलेली मुले थेट रात्री घरी परतली