तुम्हाला माहितीय? सफरचंद आणि कांदा यांची चव एकसारखी आहे, आम्ही असं का म्हणतोय 'हे' तुम्हीच वाचा...
Apple Onion Taste : हे वाचून जरी तुम्हाला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. सफरचंद आणि कांदा यांचा गंध म्हणजे वास वगळला तर, या दोन्हीची चव एकसारखी आहे.
Apple Onion Taste : तुम्हाला ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे. सफरचंद (Apple) आणि कांदा (Onion) यांची चव एकसारखी आहे. हे दोन्ही खाताना त्यांची चव एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे. मग आम्ही असं का म्हणतोय, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हा कोणताही विचित्र दावा नसून हे सत्य आहे. इतकंच नाही तर हे संशोधनातही उघड झालं आहे. एकीकडे गोड सफरचंद आणि दुसरीकडे रडवणारा कांदा हे वेगळे असताना त्यांची चव एकसारखी कशी? एका संशोधनानुसार, सफरचंद आणि कांदा यांचा वास वगळला तर त्यांची चव एकसारखीच असते. हे कोणत्या आधारावर आणि यामागचं नेमकं लॉजिक काय आहे जाणून घ्या.
सफरचंद आणि कांदा चवीला एकसमान
कांदा आणि सफरचंद चवीला एकसारखंच असल्याचं एक संशोधनात समोर आलं आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार, जर कांदा आणि सफरचंद कापताना पाहिलं नाही आणि त्यांचा गंध म्हणजे वास दूर केला तर या दोन्हीची चव एकसारखीच असते. गंध वगळता सफरचंद आणि कांदा यांच्या चवीतील फरक ओळखणं फारच कठीण असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ते कसं हे जाणून घ्या.
पदार्थाची चव त्याचा गंधावर अबलंबून
कोणत्याही गोष्टीची चव टेस्ट बड्स (Taste Buds) द्वारे ओळखली जाते. या पेशींमुळे मेंदूला पदार्थाची चव आणि सुगंध ओळखण्यास मदत होते. कोणत्याही पदार्थाची चव 80 टक्के त्याचा गंध म्हणजे त्याच्या वासावर अवलंबून असते. कोविडच्या काळात याचा अनुभव अनेकांना आला असेल. कारण जेव्हा वास घेण्याची क्षमता कमी होते, तेव्हा आपल्याला पदार्थाची चव कळत नाही. यामुळे कोविड काळात जेव्हा लोकांची वास येणं कमी झाली तेव्हा त्यांना अन्नाची चव समजत नव्हती. जास्ता थंडीच्या काळातही श्वास घेण्याच्या सवयीवर परिणाम झाल्याने जेवणाची चव कळतं नाही, असं अनेकदा होतं.
यामागचं कारण काय?
सफरचंद आणि कांदा यांची चव एकसारखी असण्यामागचं ही हेच कारण आहे. अनेक संशोधनांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे की, कांदा आणि सफरचंद चवीला एकसमान आहेत. काही संशोधनांमध्ये कांदा आणि बटाटा यांची चवही एकसारखी असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामागचं मूळ कारण म्हणजे या पदार्थांना त्यांची स्वतःची चव नसते. त्यांच्या गंधावर ही चव अवलंबून असते, त्यामुळे जर त्या पदार्थाला कोणताही गंध नसेल तर, या पदार्थांची चव एकसारखी असते, असं या अहवालात समोर आलं आहे.
संशोधनात काय समोर आलं?
या संशोधनाच्या अहवालानुसार, वेगळ्या वासामुळे पदार्थांची वेगळी चव निर्माण होते, कारण गंधामुळे आपल्याला चव ओळखण्यात मदत होते. त्यात गंध नसेल तर चवीत फरक पडत नाही. काही लोकांनी याचा प्रयोग देखील करुन पाहिला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे संशोधन बर्याच प्रमाणात योग्य असल्याचं आढळलं आहे. तर काहींच्या मते, कांदा आणि सफरचंद यांना वास नसेल तरीही, ते त्यांची चव ओळखू शकतात. त्यांना पदार्थ वेगळे असल्याचं समजलं. दरम्यान, अनेक लोकांनी मान्य केलं की, पदार्थाच्या चवीवर वासाचा परिणाम होतो.
संबंधित इतर बातम्या :