एक्स्प्लोर

Nagpur Violence : 38 वर्षाच्या फहीम खानने जमाव जमवला, नागपूर राड्याच्या FIR मध्ये नेमकं काय काय?

Nagpur Violence : नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील एका मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून (FIR) धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nagpur Violence : नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील महाल आणि लगतच्या परिसरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून (FIR) धक्कादायक माहिती समोर आली आहे. एबीपी माझाच्या हाती या एफआयआर बाबतची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. हिंसाचारातील मास्तर माईंडचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारणी फहीम खान नमाक व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

एफआयआरनुसार फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे. दरम्यान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी फहीम खान गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 46 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दंगेखोरांना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नागपूर राड्याचा समांतर तपास नागपूर पोलिसांसह महाराष्ट्र एटीएस देखील करणार आहे. अशातच या हिंसाचारातील प्रकरणाचा मास्तर माईंड पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती प्राप्त झाली आहे. 

फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष

नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 51 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र यात जो प्रमुख मानला जात आहे त्याचे नाव समोर आले आहे. 38 वर्षीय फहीम खान हा स्थानिक मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार नागपुरात सर्वप्रथम  महालपरा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही लोकांचा जमाव जमवून आंदोलन केलं होतं. यावेळी त्याने पोलिसांना निवेदन देऊन आपल्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले होतं.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही गटांना वेगवेगळे करत परिसरात शांतता प्रस्थापित केली होती.  मात्र सायंकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि जमाव पुन्हा याच परिसरात जमला. त्यानंतर एका गटाने आक्रमक पवित्र घेत दगडफेक आणि जाळपोळ करण्यास सुरुवात केली. अशी माहितीही आता पुढे आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

मृत्युंजय सिंह हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा 18 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP News मध्ये डे. ब्युरो महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत. शिवाय एबीपी माझा या महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनीसाठीही ते सखोल वार्तांकन करतात. गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर सखोल रिपोर्टिंग करण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षण विषयांतही विशेष रुची आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget