एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोरोना लसींच्या साठवणूकीसाठी 'गोदरेज अँड बॉइस'कडून 'अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर'ची निर्मिती

भारतात देण्यात येत असलेल्या व तपमानाबाबत अतिसंवेदनशील असलेल्या 'कोवॅक्सिन' आणि 'कोविशील्ड' या लसी साठवण्यासाठी, ऑक्टोबर 2020 मध्ये प्राप्त झालेल्या राष्ट्रीय निविदेचा एक भाग म्हणून, 2 ते 8 अंश सेल्सिअस तपमान तंतोतंत राखणारे खास रेफ्रिजरेटर्स सध्या 'गोदरेज अप्लायन्सेस'कडून बनविले जात आहेत.

नवी दिल्ली : 'गोदरेज अप्लायन्सेस' या आपल्या बिजनेस युनिटच्या माध्यमातून, देशातील आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, गोदरेज अँड बॉइस ही कंपनी सध्या देशात सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होत आहे. अतिशय संवेदनशील अशा लसी अगदी योग्य तपमानात सुरक्षितपणे साठवल्या जाव्यात, याकरता प्रगत, देशातच बनविलेली 'मेडिकल रेफ्रिजरेशन सोल्यूशन्स' या कंपनीकडून पुरविली जात आहेत. आज या कंपनीने अत्याधुनिक, अल्ट्रा-लो तपमानाचे फ्रीझर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आणि लसीची शीतसाखळी आणखी मजबूत केली. या प्रगत वैद्यकीय फ्रीझरमध्ये जीवरक्षक औषधे आणि अति महत्त्वाच्या लसी उणे 80 अंश सेल्सियस या तपमानात ठेवता येतात. भारतीय आणि जागतिक अशा दोन्ही वैद्यकीय शीतसाखळीला चालना देण्याच्या उद्देशाने हे फ्रीझर बनविण्यात आले आहेत.

भारतात देण्यात येत असलेल्या व तपमानाबाबत अतिसंवेदनशील असलेल्या 'कोवॅक्सिन' आणि 'कोविशील्ड' या लसी साठवण्यासाठी, ऑक्टोबर 2020 मध्ये प्राप्त झालेल्या राष्ट्रीय निविदेचा एक भाग म्हणून, 2 ते 8 अंश सेल्सिअस तपमान तंतोतंत राखणारे खास रेफ्रिजरेटर्स सध्या 'गोदरेज अप्लायन्सेस'कडून बनविले जात आहेत. 'डायल्युंट्स'साठी उणे 20 अंश सेल्सियसचे तपमान राखणारे वैद्यकीय फ्रीझर्स आणि कोविड लसीकरण मोहिमेत अखेरच्या टप्प्यापर्यंत लसी नेण्यासाठी लागणारे 'आईस पॅक' हेदेखील कंपनीतर्फे तैनात करण्यात येत आहेत. विशिष्ट टप्प्यापलिकडे तपमानात चढ-उतार झाल्यास या लसींचे नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आर्थिक नुकसानही होते.

'अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर'मुळे कंपनीच्या 'पोर्टफोलिओ'मध्ये एक नवीन भर पडली आहे. विशेषत: सध्या इतर काही देशांमध्ये वितरीत करण्यात येणाऱ्या एमआरएनए-आधारित लसींसाठी हे फ्रीझर अनुकूल आहेत. 'एमआरएनए-आधारित कोविड-19 लसी' या तपमानाबाबत अति-संवेदनशील असतात आणि त्या अत्यंत थंड तपमानातच साठवाव्या लागतात. वातावरणातील इतर रेणूंमुळे नष्ट होण्याचा सततचा धोका 'एमआरएनए'ला असतो. लस उत्पादकांनी 'सिंथेटिक एमआरएनए'मध्ये रासायनिक बदल करून ते संरक्षक थरामध्ये गुंडाळले असले, तरी लसींचा अपव्यय रोखण्यासाठी त्या उणे 80 अंश सेल्सियसपेक्षा कमी तपमानात साठवणे आवश्यक असते. अन्यथा त्याचा थेट परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच, शीतगृह साखळीशी संबंधित लॉजिस्टिकल मुद्द्यांमुळे लसीकरण प्रक्रियेत कोणतीही नासाडी किंवा अकार्यक्षमता टाळली जाणे आवश्यक आहे.

'अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर'ची सध्याची उत्पादन क्षमता वर्षाकाठी 12 हजार युनिट्स इतकी आहे. वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन वर्षाकाठी 30 हजार युनिट्स इतके त्वरेने वाढवण्याच्या दृष्टीने, गोदरेज अप्लायसेस प्रयत्न करीत आहे.

अखेरच्या टप्प्यापर्यंत लस नेण्याच्या पुढील प्रवासात मदत होऊ शकेल, अशा इतर मार्गांचा गोदरेज अप्लायन्सेस शोध घेत आहे. ग्रामीण महाराष्ट्रात लसीच्या रेफ्रिजरेटरने सज्ज असलेली रुग्णवाहिका चालविण्याची चाचणी तीन दिवस वीजप्रवाह न जोडता घेण्यात आली. हा मोबाइल क्लिनिकचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या रेफ्रिजरेटरमधील तपमान दर दोन तासांनी तपासले जात होते आणि ते आवश्यक त्या टप्प्यामध्ये असल्याची खातरजमा करण्यात येत होती. भारतात लसीकरणाची गती वाढत असताना, अधिक चपळ अशी दूरस्थ प्रकारची उपाययोजना ही यशाची गुरुकिल्ली ठरू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीतRohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Embed widget