एक्स्प्लोर

Stocks : ज्यादिवशी शेअर विकणार त्याचदिवशी पैसा खात्यात येणार; T+0 सेटलमेंट सिस्टम आहे तरी काय?

SEBI T+0 Settlement : ज्या दिवशी तुम्ही शेअर विकणार त्याच दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार, T+0 सेटलमेंट सिस्टम काय आहे, हे जाणून घ्या.

मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकीकडे अलिकडच्या काळात खूप वाढ झाली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक काहीशी जोखीमीची असली, तरी त्यातील नफा पाहता अनेक जण स्टॉक्समध्ये (Stocks) गुंतवणूक (Investment) करतात. यामध्ये अनेकांना भरघोस नफा कामवण्याची संधीही मिळते. तुम्हीही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत असाल तरी ही तुमच्या कामाची बातमी आहे. आता तुम्हाला स्टॉक्स विकल्यानंतर त्याच दिवशी पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेबीने आता शेअर मार्केटमध्ये T+0 सेटलमेंट सुरु केली आहे. 

सेबीकडून नवीन सेटलमेंट लागू

भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (Securities and Exchange Board of India) म्हणजेच सेबी (SEBI) कडून नवी सेटलमेंट लागू करण्यात आली आहे. सेबीकडून ऑप्शनल बेसिस पर T+0 सेटलमेंट सुरु करण्यात आली आहे. 28 मार्चपासून ही नवी सेटलमेंट योजना लागू करण्यात आली आहे. सेबीने 25 स्टॉक्सवर T+0 सेटलमेंट लागू केली आहे. यामुळे हे स्टॉक विकल्यास तुमच्या  खात्यात त्याच दिवशी पैसे जमा होतील. 

ज्यादिवशी शेअर विकणार त्याचदिवशी पैसा खात्यात येणार 

शेअर बाजारात आतापर्यंत T+1 सेटलमेंट लागू होती. यामध्ये गुंतवणूकदाराने स्टॉक्स विकल्यावर त्याच्या एका दिवसानंतर त्याला त्या स्टॉकचे पैसे मिळायचे. तीन महिन्यांपूर्वी शेअर बाजार नियामक मंडळाने T+0 सेटलमेंट संदर्भात मत आणि सल्ले मागवले होते. त्यावर 12 जानेवारीपर्यंत लोकांची मते मागवण्यात आली होती. सहा दिवस आधी शेअर बाजार नियामकाने 6-चरण मार्गदर्शक तत्त्वे  जारी केली होती.

T+0 सेटलमेंट सिस्टम आहे तरी काय?

सेबीकडून T+0 सेटलमेंट सध्या चाचणीसाठी काही स्टॉक्सवर लागू करण्यात आली आहे. NSE आणि BSE मधील काही शेअर्सवर T+0 सेटलमेंट लागू करण्यात आली आहे. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) 25 स्टॉक्सची यादी जाहीर केली आहे, ज्यावर T+0 सेटलमेंट लागू असेल. यामुळे ज्या दिवशी तुम्ही हे शेअर विकाल त्याच दिवशा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील.

T+0 सेटलमेंटचा गुंतवणूकदारांना कसा फायदा होईल?

T+0 सेटलमेंट सिस्टमद्वारे, शेअर्स विकल्याच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे जमा होतील.

शेअर्स खरेदी केल्यावर, शेअर्स त्याच दिवशी डिमॅट खात्यात जमा केले जातील, जेणेकरून तुमची इच्छा असल्यास, तुम्ही त्याच दिवशी शेअर्स गहाण ठेवू शकता. आतापर्यंत शेअर्स दुसऱ्या दिवशी डिमॅट खात्यात जमा होत होते, आता त्याच दिवशी होतील.

यामुळे गुंतवणूकदारांना पैसे आणि शेअर्स खरेदी-विक्रीसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

गुंतवणूकदारांकडे कमी कालावधीसाठी पैसे असले तरी ते बाजारात नफा कमवू शकतील.

T+0 सेटलमेंट दोन टप्प्यात लागू होणार

SEBI ने दिलेल्या माहितीनुसार, सर्व गुंतवणूकदार T+0 सेटलमेंट सिस्टमसाठी पात्र आहेत. SEBI ने T+0 सेटलमेंट दोन टप्प्यात लागू होणार आहे.

  • पहिला टप्पा : जर तुम्ही ट्रेडिंगच्या दिवशी दुपारी 1:30 पर्यंत शेअर्स विकले तर त्यांची सेटलमेंट 4:30 वाजेपर्यंत केली जाईल.
  • दुसरा टप्पा : दुपारी 3:30 वाजेपर्यंत केलेल्या सर्व व्यवहारांचा पैसा तत्काळ खात्यात जमा होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Top 20 Stocks : जागतिक बाजारात तेजीचा भारतीय बाजारावर परिणाम, या 20 स्टॉक्सवर असेल सर्वांची नजर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget