Pune Car Accident: पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला 'तो' कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज तपासणार
Pune News: ससूनच्या रक्त चाचणी विभागातील कर्मचारी नॉट रिचेबल, संशय वाढला, पोलिसांची सावध भूमिका. पुणे रक्त चाचणी विभागातून ब्लड सॅम्पल बदलल्यानंतर एसआयटीकडून चौकशी. डॉ. पल्लवी सापळे एसआयटीच्या प्रमुख.
![Pune Car Accident: पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला 'तो' कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज तपासणार Pune Car Accident Sassoon hospital blood testing department one employee is not reachable Pune police undergo CCTV footage Pune Car Accident: पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला 'तो' कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज तपासणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/28/de6a339b73dc81b9f8e93bdc21ed3a351716879447424954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण आता एका वेगळ्याच ट्रॅकवर जाऊन पोहोचले आहे. सुरुवातीला फक्त एक डिंक अँड ड्राईव्ह अपघात (Pune Car Accident) असे स्वरुप असलेल्या या प्रकरणाने पुण्यातील संपूर्ण शासनयंत्रणेची पोलखोल केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील पोलीस, आरोग्य आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराची काळी बाजू समोर आली आहे. सध्या ससून रुग्णालय (Sassoon Hospital) हे पुणे अपघात प्रकरणाचे केंद्रस्थान बनले आहे. याच रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या धनिकपुत्राच्या ब्लड सॅम्पलची (Blood Sample) अदलाबदल केल्याची माहिती काल समोर आली होती. त्यानंतर आज आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याचे सांगितले जात आहे. हा कर्मचारी नेमका कोण आहे आणि याप्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय होती?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, ससूनच्या रक्त चाचणी विभागातील हा कर्मचारी सध्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून कोणीही बेपत्ता नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात पोलीस या कर्मचाऱ्याचा शोध घेत असल्याचे समजते. पोलिसांनी ससून रुग्णालयातील पुणे अपघातानंतरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून बारकाईने पाहिले जाईल. त्यानंतर रक्त चाचणी विभागाच्या परिसरात असणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना आम्ही चौकशीसाठी बोलावणार आहोत. जो कर्मचारी चौकशीला येणार नाही, त्याला जबरदस्तीने आणले जाईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.
तत्पूर्वी ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे या मंगळवारी सकाळी रुग्णालयात पोहोचल्या. त्यांच्याकडून ससूनच्या रक्त चाचणी विभागातील कार्यपद्धती कशी आहे, याची माहिती घेतली जाईल. त्याआधारे ससूनच्या डॉक्टरांनी धनिकपुत्राची ब्लड सॅम्पलची अदलाबदल कशी केली?, याविषयीचा अहवाल डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडून सादर केला जाईल.
पुणे विद्यापीठात गांजा सापडला
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा सापडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. विद्यार्थी संघटनांकडून याबाबत आवाज उठवण्यात आला होता. सुषमा अंधारे आज पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आणखी वाचा
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)