Pune Accident: पुणे अपघात प्रकरणी यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये, 48 तासात अहवाल सादर, थोड्याच वेळात कारवाईचा आदेश निघणार
Pune Kalyani Nagar Accident: डॉक्टर आणि शिपाई यांनी गंभीर स्वरूपाचे केलेलं कृत्य पाहता आज दुपारी 3 पर्यंत निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई : पुण्याच्या कल्याणीनगरमधील (Pune Kalyani Nagar Accident) पोर्शे कार (Porsche) अपघात प्रकरणात ससूनच्या (Sassoon Hospital) दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली. या प्रकरणी जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे (Pallavi Saple) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने अॅक्शन मोडमध्ये येत 48 तासात तपास पूर्ण केला असून ब्लड सॅम्पल अफरातफरी प्रकरणी आज दुपारपर्यंत कारवाई होणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. तसेच गंभीर कृत्य केल्याचे देखील अहवालात नमूद केले आहे.
पुण्याच्या कल्याणीनगरमधील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात दोन डॉक्टर अडकल्यानं ससून हॉस्पिलटची पुरती नाचक्की झाली आहे. या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं एक विशेष तपास पथक नियुक्त केलंय. या समितीने दिलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याच नमूद केली आहे. डॉक्टर आणि शिपाई यांनी गंभीर स्वरूपाचे केलेलं कृत्य पाहता आज दुपारी 3 पर्यंत निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
थोडयाच वेळात निलंबन होणार
ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी तयार करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख डॉ पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केला. आता तो अहवाल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देखील प्राप्त झाला . अहवाल प्राप्त झाल्याने तातडीने क्लास वन अधिकारी डॉ. अजय तावरे यांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना कळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर डॉ. श्रीहरी हरनोळ हे क्लास टू चे रँकचे अधिकरी आहेत. हरनोळ आणि शिपाई घटकांबळे यांची तातडीने शासन स्तरावर थोडयाच वेळात निलंबन होणार आहे.
SIT समितीमध्ये कोण?
एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. याशिवाय, या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होते.
हे ही वाचा :
Pallavi Saple : ससूनमध्ये डॉ. पल्लवी सापळेंच्या समितीसाठी चमचमीत बिर्याणीचा बेत, चौकशी होईपर्यंत कर्मचारी उपाशी