Pune Supriya Sule : वडिलांवरचा आरोप लेकीनं खोडून काढला; आमित शाहांना धन्यावाद म्हणत सुप्रिया सुळेंनी सडेतोड उत्तर दिलं!
मी अमित शहांचे धन्यवाद मानते कारण त्यांनी यावेळी आमच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. आतापर्यंत त्यांनी NCP म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी म्हटलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुणे : सध्या राजकारणात अनेक नेते एकमेकांवर टीका आणि ताशेरे ओढताना (Loksabha Election 2024) दिसत आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुकांमुळे अनेक चर्चा रंगत आहे. त्यातच भाजप नेते अमित शहांनी (BJP Leader Amit Shah) महाराष्ट्रात बैठका (Maharashtra Political News)आणि सभा घेतल्या. त्यात त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)चांगलाच हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील 10 वर्षांच्या कामाचा हिशेब विरोधकांकडून मागितला जातो. पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून तुमचा भार वाहत आहे, असं ते म्हणाले याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) प्रतिक्रिया दिली आहे. 'मी अमित शहांचे धन्यवाद मानते कारण त्यांनी यावेळी आमच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. आतापर्यंत त्यांनी ज्यावेळी महाराष्ट्रात दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी NCP म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी म्हटलं आहे. मात्र त्यांनी यावेळी असे कोणतेही आरोप केले नाहीत. आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही 55 वर्ष जर महाराष्ट्र जनतेने साहेबांना प्रेम दिलं आहे तर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर त्यातच आहे', असं त्या म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
'आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही. 55 वर्ष जर महाराष्ट्र जनतेने साहेबांना प्रेम दिलं आहे तर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर आहे. आमच्यावर आता परिवारवादाचे आरोप केले जातात. परिवारवादावरुन आरोप केले त्यामुळे धन्यवाद, मात्र त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप यावेळी केले नाहीत. आतापर्यंत त्यांनी ज्यावेळी महाराष्ट्रात दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी NCP म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी म्हटलं आहे. मात्र त्यांनी यावेळी असे कोणतेही आरोप केले नाहीत. भाजपमध्येही अनेक राजकीय परिवार आहेत आणि मी आहेच परिवारवाद, असं त्यांनी खडसावून सांगितलं.
एकत्र 48 जागा लढणार!
आम्ही सगळे मिळून लोकसभेत 48 जागा लढणार आहोत आणि या सगळ्या जागा जिंकणार आहोत. महायुतीत कोणी कोणाला किती जागा द्याव्या हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र या देशात आणि राज्यात भ्रष्टाचार आणि बेरोजगारी वाढली आहे. आपला देश भ्रष्टाचारमुत्त करायचा आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी काम करणार आहोत. एकत्र लढणार आणि जिंकणार आहोत, असा दावा सुप्रिया सुळेंनी केला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Shahaji Patil: शरद पवारांना सध्या 'या' कारणामुळे सतत राग येतोय, शहाजीबापू पाटलांनी सांगितलं कारण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
