ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, आणखी एका सहकाऱ्याने साथ सोडली, शिंदे गटात प्रवेश करणार
Vijay Karanjkar will Joins Shinde Group : ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
Vijay Karanjkar will Joins Shinde Group : ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रचाराचा धडाका सुरु असताना नाशिकमधील एका सहाकाऱ्याने ठाकरेंची साथ सोडली आहे. ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विजय करंजकर (Vijay Karanjkar) आज रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेणार आहेत. करंजकर भेट घेऊन लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार करतील अशी माहिती आहे. शिवसेना नेते सचिव चौधरी यांच्या मध्यस्थीने होणार हा पक्ष प्रवेश होणार आहे. मातोश्रीवरून शब्द देऊनही करंजकर यांचे ऐनवेळी तिकीट कापण्यात आल्याने करंजकर नाराज असल्याची चर्चा होती.
तिकीट मिळालं नाही म्हणून भरला अपक्ष अर्ज
विजय करंजकर हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा संघटक म्हणू त्यांच्यावर जबाबदारी होती. ते नाशिकमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. मात्र, मातोश्रीवरुन शब्द देऊनही मला उमेदवारी मिळाली नाही, असं करंजकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर विजय करंजकर यांनी 3 मे रोजी बंडखोरी केली होती. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. करंजकर यांनी अपक्ष अर्ज भरल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात होता. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरताना माझ्यासोबत भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक आहेत, असा दावाही त्यांनी केला होता. करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आल्यानं ते नाराज झाले.
नाशकात हेमंत गोडसेंविरोधात राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अचानक सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, शेवटपर्यंत करंजकर यांची नाराजी दूर करण्यात ठाकरेंना यश आलेले नाही. त्यामुळे शिंदेंच्या हेमंत गोडसेंविरोधात राजाभाऊ वाजे लढणार आहेत. तर करंजकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला किती फटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भुजबळांना उमेदवारी न मिळाल्यांनी ओबीसी समाज आक्रमक
हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने नाशिकमध्ये ओबीसी समाजाची आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याबाबत ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. आम्ही 70 टक्के ओबीसी आहोत तरीही तिकीट मिळाले नाही. 'आता तरी उठ ओबीसी जागा हो!!' असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे. मतपेटीत आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसैनिकाचा शिंदे गटात प्रवेश होत असल्याने हेमंत गोडसेंना दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या