लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
बीडच्या प्रकरणावर जयंत पाटलांनी प्रतिक्रीया देणं टाळलं. बीडच्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत जातात का विचारल्यावर या प्रकरणात आधीच टोकाची भूमिका घेण्यात अर्थ नसल्याचं ते म्हणाले.
Jayant Patil On Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin) जोरावर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचं आवाहन महायुतीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केलं. निवडणूकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची छाननी होणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व घरी चारचाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यांची स्रुटीनी (पडताळणी) होणार असल्याचं महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरेंनी सांगितल्यानंतर आता लाडकी बहीण योजना ज्या सवलती यापूर्वी दिल्यात त्या कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नयेत. जे निकष लावायचे आहेत ते इथून पुढील नवीन लाडक्या बहिणींसाठी लावा असं विरोधीपक्षनेते जयंत पाटील म्हणाले आहेत.
लाडक्या बहिणींचे पैसे बंद होता कामा नयेत. लाडक्या बहिणींनी स्वत: लाईनीत उभारून अर्ज भरले आहेत. त्यांना थांबवणं योग्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. बीडच्या प्रकरणावर जयंत पाटलांनी प्रतिक्रीया देणं टाळलं. बीडच्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत जातात का विचारल्यावर या प्रकरणात आधीच टोकाची भूमिका घेण्यात अर्थ नसल्याचं ते म्हणाले. देशमुख हत्या प्रकरणात पोलीस योग्य तपास करून योग्य माहिती पुढे आणतील. नेमका आका कोण हे आका शब्द आणणाऱ्याला विचारा असंही ते म्हणाले.
लाडक्या बहिणींची पडताळणी होणार
राज्यात जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून दरमहा दीड हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. आता, या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे, पण सरसकट स्क्रुटीनी होणार नाही. स्थानिक प्रशासनाकडून ज्या तक्रारी येतील त्यांच्यावर कारवाई होईल. चार चाकी गाड्या असणाऱ्या लाभधारकांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांजे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांची स्क्रुटीनी होण्याचा विषयच नाही, असेही तटकरे यांनी म्हटले. आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत, 60 ते 70 टक्के लोक असे आहेत जे पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत, त्यांचं उत्त्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. ते या स्क्रुटीनीच्या निकषात नाहीत. ज्यांचं आधारकार्ड आणि बँक खाते नंबर मॅच होतं आहे, ते देखील स्क्रुटीनीमध्ये येणार नाहीत. कारण, त्यांचं उत्पन्न किती आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
हेही वाचा:
लाडक्या बहिणींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?