Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
Anjali Damania on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असे वक्तव्य केले.
Anjali Damania on Devendra Fadnavis : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असे वक्तव्य केले. आता अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संतोष देशमुख प्रकरणाच्या हत्येच्या निषेधार्थ बीड, परभणी आणि पुण्यात मोर्चा निघाला आहे. तर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते माझा छळ करत असल्याचा आरोप केलाय, याबाबत विचारले असता मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहेत. काहीही झाले तरी या प्रकरणात कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही. या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हफ्ते वसुली करतात, असा सगळ्यांवर आम्ही जरब बसवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य कारवाई सुरु आहे. अंजली दमानिया यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी, पोलीस यावर निश्चित कारवाई करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
यानंतर अंजली दमानिया यांनी पलटवार केलाय. त्यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री आम्हाला आता म्हणत आहेत पोलिसांकडे जा, अरे आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मी डीजींना मॅसेज केला, मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला देखील मॅसेज केलाय. मी मॅसेज देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे, त्यांना एक कॉल करता येत नाही का? पोलिसांना सगळे डिटेल्स दिले आहेत. मात्र तरीही कारवाई नाही केली, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा