पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Gunratna Sadavarte on Manoj Jarange Patil : देशमुख कुटुंबीयांना धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेंना रस्त्याला फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.
Gunratna Sadavarte on Manoj Jarange Patil : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मूक (Parbhani Muk Morcha) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातील सभेतून बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना थेट इशारा दिला होता. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. आता यावरून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, पावशेर दारू पिऊन जर कोणी धनजय मुंडे यांना अपमानित करण्याचे धाडस दाखवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. तुमच्या बापाचे रस्ते आहे का बे? शेतीला शेत असेल तरी वाट द्यावी लागते. जरांगे तुझं काय शिक्षण आहे? जरांगे, धस कोणीबी असो. मृत टाळूवरचं लोणी खात आहेत. एखाद्या मृत व्यक्तीचे राजकारण हे करत आहेत. आज पंकजा ताई आणि धनंजय मुंडे मंत्री दिसतात, ही बाबासाहेबांची देण आहे. जरांगे आणि धस तुम्ही सुपारीबाज आहात. मातमच्या जागी तुम्ही शिमग्यासारखं वागत आहात. धस आपण वैयक्तिक आयुष्यावर बोलू नये. आम्ही धस आणि पावशेरचे चालू देणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केलाय.
ग्रामपंचायत बंद करू देणार नाही
सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत विचारले असता गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, हा देश मुगली नाही. ग्राम पंचायत बंद केल्याचा इशारा दिला तर सांगतो ते सरपंच बडतर्फ होतील, ते लोकसेवक आहेत. जे जे ग्रामपंचायत बंद करतील त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करू. ही लोकसेवेची संविधानिक पदं आहेत. ती माज करण्यासाठी नाही. त्यामुळे ग्रामपंचायत बंद करू देणार नाही. मी न्यायालयात जाईल आणि डंके की चोट पे टाळे खोलू. असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा