Sanjay Raut : राज्यात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट, अण्णा हजारेंनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही; संजय राऊतांनी डागली तोफ
Sanjay Raut on Anna Hazare : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला पराभवाचा धक्का बसला. यावरून अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल केला होता.

Sanjay Raut on Anna Hazare : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत (Delhi Vidhan Sabha Election) तब्बल 27 वर्षांनंतर भाजपने (BJP) स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 70 जागांपैकी तब्बल 48 जागांवर विजय मिळवत भाजपने दिल्ली काबीज केली आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) दिग्गजांचा पराभव झाला. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा भाजपच्या परवेश वर्मांनी पराभव केला. तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव झाल्याचे म्हटले होते. तसेच एवढे प्रेम केले तुमच्यावर, पण तुम्ही रस्ता सोडून गेलात. त्यामुळेच नाईलाजाने तुमच्याविरोधात बोलावं लागलं, असे म्हणत अण्णा हजारे रडल्याचे दिसून आले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी केले. नाहीतर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती? रामलीला मैदान, जंतर मंतर रोड कधी पाहिला असता? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहित झाले, नाहीतर ते राळेगणचे दैवत होते.
अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही
पाणीप्रश्न आणि शेतीच्या प्रश्नावर काम करत होते. भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईला केजरीवाल आणि सिसोदिया यांनी तोंड फोंडले, अण्णा हजार त्याचे प्रतिक होते. त्यानंतर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचे सरकार असेल त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही, हे दुर्दैवाने सांगायला लागत आहेत. भ्रष्ट सरकारच्या बाजूने ते उभे राहिलेत. अण्णा हजारे गांधीवादी आहेत, जर त्यांनी आताही सत्याची कास धरली तर आजही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
