Sanjay Raut : निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जातायत, मतदार याद्यांमध्ये घोळ; दिल्लीच्या निकालावरुन संजय राऊतांची भाजपवर आगपाखड
Sanjay Raut : निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जात असून मतदार यादीतील घोळ महाराष्ट्रप्रमाणे इतरही राज्यात ही केला जात असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई: राजकारणात, संसदीय लोकशाहीत जय-पराजय, हार-जीत होत असते. मात्र मागच्या दहा वर्षात भाजप सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीत निवडणूक होत नाही आहेत. विजयासाठी साम दाम दंड भेद वापरलं जात आहे. निवडणुका (Delhi Election Result 2025) सैतानी पद्धतीने लढवल्या जातायत. मतदार यादीतील घोळ महाराष्ट्रप्रमाणे इतरही राज्यात ही केला जात आहे. किंबहुना दिल्लीमध्ये काँग्रेस (Congress) आणि आप (AAP) एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता, यातून शिकायला हवं, असा दावा करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर (Delhi Election Result 2025) भाष्य केलं आहे.
केजरीवालांचा पराभव झाला याचा आनंद आण्णांना झाला- संजय राऊत
आण्णा हजारे काय बोलतात त्याला अर्थ नाही. मोदींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाले त्यावेळी ते होते कुठे? केजरीवाल यांचा पराभव झाला याचा आनंद आण्णांना झाला आहे. देश लुटला जातोय, एकाच उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जातयं. याने लोकशाही टिकेल का? असा सवाल ही खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही खुर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते महाराष्ट्रातलं सरकार ही येड्यांची जत्रा आहे. मुख्यमंत्री पदाची खूर्ची गेल्यावर फडणवीस यांचा तो चेहरा बघितला तर ज्यांची खुर्ची गेल्याने ते कसे रूसून बसले आहेत तेही आपण पाहतोय. असेही संजय राऊत म्हणाले.
फडणवीसांना विजयाचं हॅग ओव्हर झालाय- संजय राऊत
अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झाली नसती. 2019 ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणताय, मग 2014 ला काय झालं होतं? का भाजपने तेव्हा युती तोडली? शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात भाजपने निवडणूका लढवल्या. फडणवीस यांना विजयाचं हॅग ओव्हर झालायं किंवा ते सारखा विजय पाहून डिपरेस झालेल आहेत. किंबहुना शिंदेंचं ऑपरेशन कधी अमित शहा करतील हे त्यांना ही कळणार नाही. असा टोला ही संजय राऊत यांनी लगावला आहे.
बीडची जनता मुर्ख वाटली का?- संजय राऊत
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक होत नसेल तर फडणवीस का म्हणतात कोणाला सोडणार नाही. असे असेल तर मग आरोपीला अटक का होतं नाही? बीडमध्ये जाऊन मुख्यमंत्री हारतुरे काय स्विकारत आहेत? ही त्यांची मिलीभगत आहेत. जरांगे पाटील यांचे मुद्दे पाठीशी टाकण्यासाठी धस याना पुढे आणलं जातं आहे का? मुख्यमंत्री नेमकं कोणाला पाठीशी घालत आहेत? बीडची जनता मुर्ख वाटली का? असा अनेक सवाल ही संजय राऊत यांनी यावेळी विचारले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
