एक्स्प्लोर

Beed Lok Sabha: लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे

Maharashtra Politics: पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव. बीडमधील समर्थकांनी आयुष्य संपवलं, पंकजांनी घेतली कुटुंबीयांची भेट

बीड: लोकसभा निवडणुकीतील माझ्या पराभवानंतर निराश झालेले लोक स्वत:चे प्राण देत आहेत. लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने मला सध्या अपराधी वाटत आहे. एरवी मी हिंमतीने लढणारी आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींमुळे मी सध्या प्रचंड डगमगली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा येथील पांडुरंग सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बीड लोकसभा निवडणुकीतील (Beed Lok Sabha Result) पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या पांडुरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसला होता. याच नैराश्याच्या भरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची पंकजा मुंडे यांनी आज भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे भावूक होताना दिसल्या. 

पांडुरंग सोनवणे यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी हिंमतीने लढणारी आहे, पण सध्या या गोष्टींनी प्रचंड डगमगली आहे. या कुटुंबाच्या मागे मी उभी राहणार आहे. पण आत्महत्येसारख्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही. मी लोकांना आवाहन करते की, त्यांनी असं काही करु नये. आपल्या लहान लेकरांना, परिवाराला वाऱ्यावर सोडून असे आत्महत्या करणे हे मला पसंत पडणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर मी नक्की तुम्हाला त्याची संधी देईल. पण आपला जीव गमावू नका. तुमचा जीव म्हणजे माझा जीव आहे असं समजून जपा तो, शपथ आहे या निराशेतून बाहेर या, जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असला पाहिजे. तुमचा आक्रोश आणि प्रेम तुमच्या वर्तवणुकीतून, कामातून आणि कष्टातून व्यक्त करा, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

लोकांमध्ये न्यूनगंड तयार होतोय: पंकजा मुंडे

माझी तुम्हाला शपथ आहे की, या निराशेतून बाहेर या. जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असला पाहिजे. राजकारणात जय-पराजय हे सुरु असते. पण सध्या राजकारण ज्या पद्धतीने आकार घेत आहे, त्यामुळे लोक निराशेच्या गर्तेत कोसळत आहेत. आम्ही कमी आहोत, आम्ही राजकारणाच्या प्रवाहात काहीच बदलू शकत नाही, असा न्यूनगंड लोकांमध्ये तयार होत आहे. ज्या पद्धतीने राजकारण बदलत आहे, या भावना लोकांना आक्रोशाकडे नेत आहेत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

आणखी वाचा

"जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो"... पंकजा मुंडे कळवळल्या; समर्थकांना म्हणाल्या, तुम्हाला माझी शपथ, जीवाचं बरवाईट करु नका!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तनिष्क शोरुमवर सशस्त्र दरोडा, 6 चोरट्यांनी 25 कोटींचे दागिने लुटले, दोघांना गोळ्या घालून दोन पोती दागिने जप्त
तनिष्क शोरुमवर सशस्त्र दरोडा, 6 चोरट्यांनी 25 कोटींचे दागिने लुटले, दोघांना गोळ्या घालून दोन पोती दागिने जप्त
Nagpur News: शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकूर
शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकूर
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha : Maharashtra NewsMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 11 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaSpecial Report | Ajit pawar Budget | अर्थसंकल्पात कवितांची मैफल,दादांच्या कवितांनी उपस्थितांचं मनोरंजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तनिष्क शोरुमवर सशस्त्र दरोडा, 6 चोरट्यांनी 25 कोटींचे दागिने लुटले, दोघांना गोळ्या घालून दोन पोती दागिने जप्त
तनिष्क शोरुमवर सशस्त्र दरोडा, 6 चोरट्यांनी 25 कोटींचे दागिने लुटले, दोघांना गोळ्या घालून दोन पोती दागिने जप्त
Nagpur News: शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकूर
शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकूर
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Embed widget