एक्स्प्लोर

हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली

पुण्यातील घटनेवर बोलताना मी मेधाताईंचं अभिनंदन करतो, असे म्हणत मेधा कुलकर्णी यांचे समर्थनही राणेंनी केलं.

पुणे : राज्यातील पुरोगामी विचाराचं शहर आणि शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे (Pune) शहरात भगवा आणि हिरव्या रंगाचा वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची दखल घेत भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांनी भींतीचा रंगच बदलून टाकला आहे. मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या समर्थकांनी भींतीवरील त्या हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्या ठिकाणी एक गणपतीचा फोटो ठेवला आहे. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा दावाही मेधा कुलकर्णी यांनी केला. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया, असं आवाहनही त्यांनी केलं. त्यानंतर, आता भाजपचे हिंदुत्ववादी नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही पुण्यातील घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.  

पुण्यातील घटनेवर बोलताना मी मेधाताईंचं अभिनंदन करतो, असे म्हणत मेधा कुलकर्णी यांचे समर्थनही राणेंनी केलं. हिरवे आक्रमण होत आहेत, हिरवे साप वळवळतात आणि वातावरण खराब करतात. पण,  हिंदू समाज म्हणून हे काम केलं पाहिजे, असे वळवळणारे साप ठेचलेत पाहिजेत, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले. कडवट हिंदुत्ववादी म्हणून राज्यात असे प्रकार होणार नाही हा संदेश आधीच गेलाय. हिरवं आक्रमण थांबवणं आमचं कर्तव्य आहे, अशा शब्दात नितेश राणेंनी नेहमीप्रमाणे भूमिका मांडली. मात्र, नितेश राणे हे राज्याचे मंत्री आहेत, त्यामुळे मंत्री म्हणून त्यांची जीभ घसरल्याचे बोलले जात आहे. 

अयोध्या मिळवलं, श्रीकृष्णभूमीही मिळवणार

जे आमचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. इस्लामिक आक्रमण झालं, मंदिरावर मस्जिदी बांधण्याचा कार्यक्रम केला. मात्र, ही भूमी आमची आहे, येथील इंच न् इंच जमीन आमची आहे. अयोध्या मिळवलं, आणि श्रीकृष्ण भूमीदेखील मिळवून राहणार असे म्हणत मंत्री नितेश राणे यांनी मुथरा येथील जागेवरुन पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन परखड मत व्यक्त केलं आहे. एका बाजूला कायदेशीर मार्गाने चालत आहोत आणि त्याचबरोबर हिंदू समाजात जागृती झाली पाहिजे. आपण एकत्र आहोत, आपल्याकडून जे घेतलं गेलं तिथे आपलं मंदिर आहे, जे मिळवलं पाहिजे, अशा शब्दात नितेश राणेंनी आपली भूमिका मांडली आहे. 

हेही वाचा

15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बॅन, बोहरा समाजाच्या धर्मगुरुंचं फर्मान; पुण्यातील आई-वडिलांनाही मान्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar : क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, आरोपीचं पोलिसांना पत्रMedha Kulkarni Pune : मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंगAnjali Damania : मुख्यमंत्र्यांचे आदेशावर दमानिया म्हणतात... वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का?ABP Majha Headlines : 11 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Nashik Crime : बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Embed widget