एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका, देवेंद्र फडणवीसांची कळी खुलली, म्हणाले...

Devendra Fadnavis on Vidhan Parishad Election, Mumbai : विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election)महायुतीने मोठा विजय मिळवलाय. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे.

Devendra Fadnavis on Vidhan Parishad Election, Mumbai : विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election)महायुतीने मोठा विजय मिळवलाय. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे. राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करुन दाखवलाय. दरम्यान , निवडणुकीत यश मिळवल्यानंतर एबीपी माझाने पहिली प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले. कोणतेही भाष्य न करता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी विजयी थंब दाखवला आणि सहकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. 

काँग्रेसची 8 मतं फुटली, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का, ठाकरे-पवारांना मतं फोडण्यात अपयश

विधानपरिषद निवडणुकीचे निकाल (Vidhan Parishad Election) हाती आले आहेत. भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाय, शिंदेंच्या शिवसेनेचे मतं फुटलेले नाहीत. 

कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार विजयी? 

भाजपचे विजयी उमदेवार

1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार

1) भावना गवळी - 
2) कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर

काँग्रेस विजयी उमेदवार

1) प्रज्ञा सातव - 26

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

1.) मिलिंद नार्वेकर  

काँग्रेसकडून आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नाही

विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत होता. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीला 9 जागा, मविआच्या प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर विजयी, शेकापचे जयंत पाटील पराभूत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget