Maharashtra Vidhan Parishad election Result : तिसरा उमेदवार उभा करून मविआने काय मिळवलं? काय गमवलं?
Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Nikal Live updates : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महयुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत.

Background
Maharashtra Vidhan Parishad Election Live Updates : आजच्या विधानपरिषद निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एकूण 11 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या आहेत. अकराव्या जागेवर मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. तर, शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांचा पक्ष
भाजपाचे विजयी उमेदवार
- पंकजा मुंडे (Pankaja Munde)
- परिणय फुके (Parinay Fuke)
- अमित गोरखे (Amit Gorkhe)
- योगेश टिळेकर (Yogesh Tilekar)
- सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)
शिवसेनेचे विजयी उमेदवार (एकनाथ शिंदे)
- भावना गवळी (Bhavana Gavali)
- कृपाल तुमाने (Krupal Tumane)
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार (अजित पवार)
- राजेश विटेकर (Rajesh Vitekar)
- शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje)
काँग्रेसच्या विजयी उमेदवार
- डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Satav)
शेतकरी कामगार पक्ष (शरद पवार समर्थन)
- जयंत पाटील (Jayant Patil) : पराभव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) : विजयी
Maharashtra Vidhan Parishad Election Result : तिसरा उमेदवार उभा करून मविआने काय मिळवलं? काय गमवलं?
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण तिसऱ्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. तिसरा उमेदवार उभा केला नसता तरीदेखील महायुतीची 9 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकून आले असते. म्हणजेच निवडणूक घेतली असली तरीही अपेक्षित असाच निकाल लागला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका, देवेंद्र फडणवीसांची कळी खुलली, म्हणाले...
विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election)महायुतीने मोठा विजय मिळवलाय. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे. धानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका, देवेंद्र फडणवीसांची कळी खुलली, म्हणाले...सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...






















