एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?

Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आले आहेत. आता भुजबळांनी चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र पाठवले आहे.

Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) कमालीचे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने ते राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र, आता छगन भुजबळ येवला मतदारसंघात (Yeola Assembly Constituency) अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे.    

अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांना पत्र दिले आहे.

नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा, नाशिक तालुक्यासह जिल्हाभरात विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने (Nashik Unseasonal Rain) शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शेतातील गहू, कांदे, द्राक्षे, तूर, मका, कपाशी,हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदर झालेल्या अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या बळीराजाला अवकळीने पुन्हा अडचणीत आणले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने व वातावरणीय बदलांमुळे ऐन हिवाळ्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. तसेच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी, उन्हाळी कांद्याच्या रोपांना व रब्बी पिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा ओला झाला आहे तर काढणीला आलेला कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक जमिनीवर आडवे झाले आहे. गव्हाच्या ओंब्यांमध्ये बी तयार होत असताना पिक आडवे पडल्याने शेकडो हेक्टरवरील गहू हाताशी येणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतात उद्ध्वस्त झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना केली आहे. 

आणखी वाचा 

Ajit Pawar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच, अजित पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, काहींना थांबा सांगितलं तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Nashik Crime : बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania : मुख्यमंत्र्यांचे आदेशावर दमानिया म्हणतात... वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का?ABP Majha Headlines : 11 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंडSurendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Nashik Crime : बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Thane Crime: धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Embed widget