एक्स्प्लोर

Ajit Pawar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच, अजित पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, काहींना थांबा सांगितलं तर...

Ajit Pawar On Chhagan Bhujbal: पूर्वी 28 मंत्री आणि बाकी राज्य असायचे पण आता तसे नाही. त्यामुळे काहींना एकच खाते आले आहे, असंही अजित पवारांनी सांगितले.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून डावल्यानंतर ते दररोज उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. आता अजित पवारांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे छगन भुजबळांवर भाष्य केलं आहे. 

काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. मंत्री जास्त आहेत. पूर्वी 28 मंत्री आणि बाकी राज्य असायचे पण आता तसे नाही. त्यामुळे काहींना एकच खाते आले आहे, असंही अजित पवारांनी सांगितले. आपण विचारावर ठाम आहोत. आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार रविवारी बारामतीमध्ये बोलत होते.

छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय?

दरम्यान यानंतर भुजबळांनी देखील अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या लक्ष केलं. सुरूवातीला राज्यसभेवर पाठवलं नाही, आता आमदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जायला सांगितल्याचं छगन भुजबळांनी म्हणाले. दरम्यान छगन भुजबळांनी अजित पवारांवर वयावरुन टीकास्त्र डागलं. तर शरद पवारांचं देखील कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय?, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. 

छगन भुजबळ काय म्हणाले?

मुंबईमध्ये रविवारी (22 डिसेंबर) ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर देखील छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेत थांबावं लागलं, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा...म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसं शक्य आहे?, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असं छगन भुजबळांनी सांगितले. 

संबंधित बातमी:

खातेवाटप जाहीर होताच धनंजय मुंडेंची पोस्ट; फडणवीस, शिंदे, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, जनतेशी थेट...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक, अखेर आव्हाड यांच्याकडून सभागृहाची माफी
जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक,अखेर सभागृहाची माफी
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget