(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bajrang Sonwane on Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, बजरंग सोनवणेंची मागणी
Bajrang Sonwane on Pankaja Munde, Beed Loksabha : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांच्यातील ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
Bajrang Sonwane on Pankaja Munde, Beed Loksabha : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांच्यातील ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने यात पुढाकार घेऊन चौकशी करावी. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी देखील स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली. तर जिल्ह्यात केवळ भावनिक राजकारण केलं जात आहे. दहा वर्षात कोणताही विकास केला नाही, असा आरोप सोनवणे यांनी यावेळी केलाय.
बीड लोकसभा (Beed Loksabha) निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. गेल्या काही दिवसांमध्ये बजरंग सोनवणे यांचे नाव चंदन तस्करीमध्ये येत आहे. यावर बजरंग सोनवणे यांनी आपली प्रतिक्रिया देत माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे.
काहीजण माझ्यावर वैयक्तिक आरोप करत आहेत
बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) म्हणाले, माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. काहीजण माझ्यावर वैयक्तिक आरोप करत आहेत. गुन्हा दाखल झाला असेल तर चौकशी करा जर चूक असेल तर चूकच आहे. कोणत्याही विषयाशी माझे नाव घेण्यात चुकीच आहे. वाळू माफिया मटका किंग कोण आहेत? असा सवाल देखील सोनवणे यांनी उपस्थित केला. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
निवडणूक आयोगाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे
पुढे बोलताना बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) म्हणाले, ताईसाहेब ज्या माझ्या प्रतिस्पर्धी पक्षाकडून उभ्या आहेत. त्यांना असं बोलण्याचा अधिकार आहे का? आचारसंहिता सुरु असताना असे भाष्य केले आहे. हे तपासले गेले पाहिजे. त्यांनी लोकांना लालसा दाखवणे, चुकीचे आहे. आचारसंहितेचा भंग होत आहे. मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार होतो. मात्र, निवडणूक आयोगाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
लोकसभेला 4 जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु, अजितदादांच्या खास नेत्याने फॉर्म्युला सांगितला