Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra vidhansabha Results 2024 निकालामध्ये गडबड आहे, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदार कसे काय निवडून आणू शकतात.
Maharashtra vidhansabha Results 2024 मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पहिल्या 4 फेरीत महायुतीला मोठा विजय मिळत असल्याचे दिसून येते. महायुतीने (Mahayuti) तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून भाजपनेही शतकेपार झेंडा रोवल्याचे पाहायला मिळाले. तर, महाविकास आघाडीच्या जागा केवळ 60 ते 70 ठिकाणी आघाडीवर दिसून येतात. त्यामुळे, निकालाच्या प्राथमिक आकडेवारीवरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणूक निकालांची प्राथमिक आकडेवारी पाहता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा निकाल मान्य नसल्याचे सांगत, कुछ तो गडबड है अशी प्रतिक्रिया दिली. या निकालामागे खूप मोठे कारस्थान आहे, निकाल लावून घेतलेला दिसतोय. महाविकास आघाडीला 75 ते 100 जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी निकालावर भाष्य केलं आहे. निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले, तुफानी फटकेबाजी
निकालामध्ये गडबड आहे, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदार कसे काय निवडून आणू शकतात. ज्यांच्या गद्दारीवर महाराष्ट्रात रोष आहे, त्या अजित पवारांच्या बेईमानीविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता, हे वादळ तुम्हाला दिसत नाही. पण, आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ, युतीचं वादळं म्हणताय. आता, मीडियानेच स्वत:ला हा प्रश्न विचारावा, गडबड आहे की नाही?, अशा शब्दात संजय राऊत यांनी हातील आलेल्या निकालवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली असून नेत्यांच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
भाजपला 120 जागांवर आघाडी
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. सध्याच्या कलानुसार भाजपचे उमेदवार 120 जागांवर आघाडीवर आहेत. हे भाजपचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहेत. त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये भाजप 131 शिंदे सेना 55 आणि अजित पवार गट 35 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अवघ्या 60 जागांवर आघाडीवर आहेत. मविआत काँग्रेस 22, ठाकरे गट 20 आणि शरद पवार गटाचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत.