एक्स्प्लोर

Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळताना पाहायला मिळालं आहे. यानंतर प्रविण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार महायुतीला जोरदार यश मिळताना पाहायला मिळत आहे.  भाजपला 127, शिवसेनाला 55, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 35 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला 20, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं. 

देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं  त्यासाठी हम सब एक हैचा नारा जनतेनं मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळं अधिक मतदान झालं, असं प्रविण दरेकर म्हणाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, असं दरेकर म्हणाले. 

शिवसेना कुणाची खरी, कुणाची खोटी याबाबतचा निकाल जनतेनं दिला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जी पार्टी मोठी आहे, त्यांचा मुख्यमंत्री होतो. भाजप 125 जागांजवळ गेली आहे, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं प्रविण दरेकर यांनी केलं आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळताना दिसतंय. महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढवली गेली आहे. शिवसेनेची पदाधिकारी म्हणून आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी व्हावं, असं शितल म्हात्रे यांनी म्हटलं. 

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा निकाल विकासाच्या भूमिकेवर आल्याचं म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अटल सेतू,समृद्धी महामार्गाचं काम झालं. आता निकाल येत आहे. महायुतीचे नेते एकत्र बसतील. भाजपचे लोक एकत्र बसतील, सर्वजण एकत्र येत बैठक घेऊन निर्णय घेतील, असं केशव उपाध्ये म्हणाले. 

महायुतीला जोरदार यश 

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीनं डॅमेज कंट्रोल करत निवडणुकीच्या दिशेनं मोर्चेबांधणी केली. लाडकी बहीण योजना आणून राज्यातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळताना पाहायला मिळत आहे. महायुतीला 11 वाजेपर्यंत 222 जागांवर आघाडी मिळाली आहे. 

इतर बातम्या : 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jain Muni Nilesh Chandra Maha Katta:Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?
Akshay Laxman Majha Maha katta : माईंड रिडरची लाईव्ह कार्यक्रमात ज्ञानदा कदमवर जादू,पुढे काय झालं?
Nilesh Chandra Maha Katta : फडणवीसांच्या सरकारमध्ये गद्दार नेते; योगी आदित्यनाथांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवा
Sandesh Kulkarni Majha Maha Katta : मराठी कलाकारांना हिंदीमध्ये कमालीचा आदर असतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta:Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला दणका, 91 लाख रुपयांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा HDFC बँकेला दणका, 91 लाख रुपयांचा दंड, कारण समोर
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Embed widget