एक्स्प्लोर

लोकसभेला 4 जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु, अजितदादांच्या खास नेत्याने फॉर्म्युला सांगितला

Praful Patel on Loksabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यादांच भारतीय जनता पक्षासोबत (BJP) जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

Praful Patel on Loksabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यादांच भारतीय जनता पक्षासोबत (BJP) जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या. यामध्येही दोन उमेदवार आयात करावे लागले. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. दरम्यान, लोकसभेला राष्ट्रवादीच्या (NCP Ajit Pawar) वाट्याला कमी जागा आल्या आहेत, यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी भाष्य केलं आहे. 

प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) सारासार विचार करुन आम्ही कमी जागा घेतल्या आहेत. आम्ही जास्त जागांची मागणी केली होती, पण तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप करताना अडचणी येतात. हे विचारात घेऊन आम्ही कमी जागांवर समाधान मानले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागांवर उमेदवार दिले आहेत. महादेव जानकरांची जागा आम्ही तिन्ही पक्षांचा विचार करुन सोडली, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं. 

विधानसभेबाबत काय म्हणाले? 

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या. पण आता विधानसभेच्या जागावाटपात (Assembly Election)  अधिकच्या जागा पदरात पाडून त्याची भरपाई करु, असं प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता' या वृत्तपत्रास मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते. 

सातारच्या जागेवर आमचा दावा होता

पुढे बोलताना पटेल म्हणाले, सातारच्या जागेवर आमचा दावा होता, पण उदयनराजे भोसले यांच्यासाठी आम्ही ती जागा सोडली. पण सातारच्या जागेच्या बदल्यात राज्यसभेची एक जागा देण्याचे आश्वासन भाजपने आम्हाला दिले आहे. याचाच अर्थ आम्हाला सहा जागा मिळाल्या आहेत, असं गणितही पटेल (Praful Patel) यांनी सांगितलं. मी कधीच शरद पवारांच्या विरोधात बोलणार नाही. सध्यस्थितीत शरद पवार (Sharad Pawar) मोठे नेते आहेत,  भविष्याचा विचार करता अजित पवार यांना अधिक पाठिंबा मिळेल. शरद पवार यांच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनात आजही आदराची भावना आहे, असंही पटेल (Praful Patel) यांनी स्पष्ट केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Prithviraj Chavan: शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार की नाही, हे 'या' एका गोष्टीवर अवलंबून; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वाचं वक्तव्य

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget