(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: माहीममध्ये मनसेला मोठा धक्का; ठाकरेंचे महेश सावंत आघाडीवर, तर राज'पुत्र' तिसऱ्या स्थानी
राज्याच्या राजकारणात बीड (Beed) जिल्हा यंदा मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान राहिला आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला याचा चांगलाच फटका बसला होता. मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात भाजप महायुतीचा पराभव झाला. त्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातही भाजपच्या बड्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर मराठा उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी 6500 मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीत येथे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यात एकूण 6 मतदारसंघ येतात. त्यामध्ये, परळी आणि माजलगावातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे