एक्स्प्लोर

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सुरुवातीच्या कलानूसार, भाजपला 115, शिवसेना शिंदे गटाला 58, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 42 जागा मिळताना दिसत आहे. 

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबई राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते. पहिल्या कौलनुसार महायुतीला 193 जागांवर आघाडी मिळाली असून 55 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर, इतरांमध्ये 8 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे. दरम्यान, 288 मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार, भाजपला 115, शिवसेना शिंदे गटाला 58, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 42 जागा मिळताना दिसत आहे. 

मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानूसार एकनाथ शिंदेंचं वर्चस्व-

288 मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार एकनाथ शिंदेंची शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या 17 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं यश मिळालं आहे. ठाकरेंच्या बाजूने सहानभुती आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मतदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचं सुरुवातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार?

एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्यात महायुतीची सत्ता स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून जम बसवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने एकट्याच्या बळावर 100 जागांचा आकडा पार केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आणखी भक्कम झाला आहे. भाजप नेतृत्त्वाने विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता बसेल, याबद्दलची शक्यता वाढली आहे. 

लाडक्या बहिणींना सलाम करतो- प्रवीण दरेकर

 भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं  त्यासाठी हम सब एक हैचा नारा जनतेनं मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळं अधिक मतदान झालं, असं प्रविण दरेकर म्हणाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, असं दरेकर म्हणाले. 

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपची बेस्ट परफॉर्मन्सकडे वाटचाल, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
NCP Ajit Pawar Group Candidate Vidhan Parishad Election 2026: सिद्धिकी, परांजपे, ठाकूर, जैन, पाटील...; विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून कोणकोण इच्छुक?
सिद्धिकी, परांजपे, ठाकूर, जैन, पाटील...; विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून कोणकोण इच्छुक?
Shivsena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: अंधारे, विचारे, दानवे, चव्हाण...शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी 6 नावांची चर्चा; कुणाला मिळणार संधी?
मोठी बातमी: अंधारे, विचारे, दानवे, चव्हाण...ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी 6 नावांची चर्चा; कुणाला मिळणार संधी?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
Embed widget