Amol Mitkari : रावणाने बाप म्हणून सीतेचे अपहरण केले : अमोल मिटकरी
Amol Mitkari, Akola : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Amol Mitkari, Akola : रावणाने बाप म्हणून सीतेचे अपहरण केल्याचं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरींच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील सांगोळा येथे रावणाच्या मंदिरात दर्शनानंतर आदिवासी समाज बांधवांना आणि सांगोळा येथील लोकांना संबोधित करताना अमोल मिटकरींनी हे वक्तव्य केलंय. अमोल मिटकरी यांनी यापूर्वीही अशाच प्रकारची वक्तव्य केली आहेत. त्यामुळे आता अमोल मिटकरी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
रावणदहन प्रथा बंद करा, अमोल मिटकरींची सरकारकडे मागणी
देशात आणि राज्यात रावणदहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची महाआरती केलीय. यावेळी आदिवासी समाज आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्यावर्षी आमदार अमोल मिटकरींनी सांगोळा गावातील रावण मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची भूमिका मांडल्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होताय. त्यांनी गेल्यावर्षी आपल्या आमदार निधीतून 20 लाखांचा निधी मंदिराच्या सभागृह आणि जीर्णोद्धारासाठी दिला होता. यानंतर राज्य आणि देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. मिटकरींनी आज परत सांगोळ्यात येत रावण दहनाच्या परंपरेवर देशभरात बंदीची मागणी केली आहे. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सांगोळ्यात रावणाची पुरातन मूर्ती
रावणाची मनोभावे पूजा आणि आरती होत असल्याचं पाहून-ऐकून आपल्याला निश्चितच आश्चर्याचा धक्का बसेल. दाक्षिणात्य राज्यात नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात होतं हे ऐकलं तर तुमचा विश्वासही बसणार नाही. मात्र, अकोला जिल्ह्यातल्या सांगोळा गावाने गेल्या अडीच शतकांपासून रावण पूजेची अनोखी परंपरा जोपासली आहे. फक्त परंपराच नाही तर या गावात 250 वर्षांपूर्वीची रावणाची सुंदर आणि सुरेख मुर्तीसुद्धा आहे. पातूर तालुक्यात असलेलं सांगोळा गाव अकोल्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या