Nashik News : नाशिकमध्ये ऋषभदेवांचा महामस्तकाभिषेक सोहळा, मांगीतुंगीमध्ये देशभरातून लाखो भाविकांची उपस्थिती
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी (Mangitungi) येथील भगवान ऋषभदेव यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला सुरुवात होत आहे. देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत.

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी (Mangitungi) येथील भगवान ऋषभदेव यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला सुरुवात होत आहे. हा महामस्तकाभिषेक सोहळा पंधरा दिवस सुरू राहणार असून देश विदेशातील भाविक याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
प्रथम तीर्थंकर ऋषभदेवांच्या जगातील सर्वात उंच प्रतिमेची निर्मिती नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी येथे झाली असून तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. यानंतर 2016 मध्ये मारुतीची प्राणप्रतिष्ठा होऊन महामस्तकाभिषेक करण्यात आला. त्यानंतर दर सहा वर्षांनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती भगवान ऋषभदेव 108 मूर्ती निर्माण समिती व आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेकाचे अध्यक्ष पीठाधीश रवींद्र किर्ती स्वामी यांनी दिली.
दरम्यान हा महोत्सव उद्यापासून सुरु होत असून या सोहळ्यात देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर ऋषभदेवपुरम मांगीतुंगी येथे भक्तगणांसाठी कॉटेज रूम्स तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जवळपास १०० खोल्या असलेली सातमजली धर्मशाळा तयार आहे. तसेच महोत्सवासाठी वाटरप्रूफ मंडप, भोजनालय, साधू संतांसाठी व्यवस्था, मूर्ती स्थळावर सुशोभीकरण केले जात आहे. मूर्ती निर्माण समितीकडून यात्रेकरूंसाठी आठ बोलेरो गाड्यांची सोया करण्यात आली आहे. ऋषभदेवपूरम येथे 81 फुट उंच गुलाबी दगडापासून सर्वतोभद्र प्राचीन महल निर्माण करण्यात आलेले आहेत
विविध मुर्त्यांची प्रतिष्ठापना
ऋषभदेव पूरम येथे कशी फोटोंचा गुलाबी दगडापासून सर्वतोभद्र प्राचीन महल निर्माण करण्यात आले आहेत. ऋषभ देव करुन जवळ मूर्ती निर्माण समिती अंतर्गत भरत चक्रवर्ती उद्यानामध्ये भगवान भरत स्वामींची दहा फूट उंचीची पद्मासन प्रतिमा स्थापित केली जात आहे. दररोज सकाळी साडेसातला महामस्तकाभिषेकाला सुरुवात होणार असून सौभाग्यशाली भाविकाद्वारे हा अभिषेक केला जाणार आहे.
भाविकांना मोफत व्यवस्था
सदर महोत्सवासाठी लाखोंहून अधिक भाविक येणार असल्याने भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था केली जात आहे. या महोत्सवाचे येणाऱ्या भाविकांसाठी ऋषभदेवपुरम मांगीतुंगी येथे भक्तगणांसाठी कॉटेज रूम्स तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जवळपास 100 खोल्या असलेली सातमजली धर्मशाळा तयार आहे. तसेच महोत्सवासाठी वाटरप्रूफ मंडप, भोजनालय, साधू संतांसाठी व्यवस्था, मूर्ती स्थळावर सुशोभीकरण केले जात आहे. मूर्ती निर्माण समितीकडून यात्रेकरूंसाठी आठ बोलेरो गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
