एक्स्प्लोर

भाजप माजी नगरसेवक बाळू मोरेंची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? गुलाबराव पाटलांनी केला खुलासा

Nashik News : जळगावच्या चाळीसगाव येथे भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. आज मोरे यांचा मृत्यू झाला असून गुलाबराव पाटील यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

Gulabrao Patil नाशिक : जळगावच्या चाळीसगाव येथे तीन दिवसांपूर्वी अज्ञातांकडून भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे (Balu More) यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एबीपी माझाला मोठी माहिती दिली आहे. 

गुलाबराव पाटील म्हणाले की, मी जळगावचा पालकमंत्री आहे. चाळीसगावातील भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे (Balu More) यांची हत्या व्यक्तिगत कारणावरून करण्यात आली आहे. आरोपींना तात्काळ पकडण्यासाठी एसपींना आदेशित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.  

नेमकं प्रकरण काय? 

महेंद्र मोरे उर्फ बाळू मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. ते आपल्या कार्यालयात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून पाच अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बाळू मोरे यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर कारमधूनच पसार झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. 

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पाच हल्लेखोर आणि कट रचनारे दोन अशा एकूण सात हल्लेखोरांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. आता बाळू मोरे यांचा उपचार सुरू असताना निधन झाल्याने या प्रकरणी खुनाचे कलम लावण्यात आले आहेत. 

हल्लेखोरांचे वाहनात सापडले जिवंत काडतुसं 

गोळीबार केल्यानंतर मारेकरी ज्या वाहनातून पसार झाले होते, ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पाच पथक रवाना झाले असून या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात दोन जिवंत काडतुसे, कोयता आणि इतर साहित्य आढळून आले आहे. 

बारक्या कारणावरून राष्ट्रपती राजवटीची मागणी योग्य नाही - गुलाबराव पाटील

दरम्यान, उद्धव ठाकरेंची राष्ट्रपती राजवट लागू जरा अशी मागणी केली. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, ही मागणी चुकीची आहे, व्यक्तिगत वादावरून घटना घडल्या आहेत, जनतेत प्रक्षोभ होईल अशा नाहीत, बारक्या कारणावरून राष्ट्रपती राजवटीची मागणी बरोबर नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Gulabrao Patil : "फडणवीस साहेब असा माणूस आहे की, आम्हाला ओढून आणलं अन् घड्याळही बंद केलं" : गुलाबराव पाटील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget