एक्स्प्लोर
बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाची चाचणी यशस्वी, 'नवदूत'मुळे नव्या युगाची सुरुवात!
भारतीय रेल्वेने एका नव्या युगात पाऊल ठेवले आहे. एका नवीन इंजिनाची निर्मिती भारतीय रेल्वेने केली आहे त्याचे नाव देखील 'नवदूत' असे ठेवण्यात आले आहे. हे इंजिन चक्क बॅटरी वर चालते. त्याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.
मुंबई : भारतीय रेल्वेने एका नव्या युगात पाऊल ठेवले आहे. एका नवीन इंजिनाची निर्मिती भारतीय रेल्वेने केली आहे त्याचे नाव देखील 'नवदूत' असे ठेवण्यात आले आहे. हे इंजिन चक्क बॅटरी वर चालते. त्याची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. अशा प्रकारचे पहिलेच इंजिन भारतात बनवण्यात आले आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाचे इंजिन ट्रेन चालताना दिसत आहे. हे इंजिन पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात बनवले गेले आहे. या इंजिनाची खासियत म्हणजे हे इंजिन पूर्णतः बॅटरीवर चालणारे, शंटिंगसाठी वापरले जाणारे इंजिन आहे. या इंजिनामध्ये ड्युअल मोडची सुविधा उपलब्ध आहे. याचाच अर्थ, इंजिन दोन्ही बाजूने चालवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या इंजिनाचा व्हिडीओ ट्विट करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी, भारतीय रेल्वेसाठी हा एक उज्ज्वल भवितव्याचे संकेत आहे असे म्हटले आहे. ' 'नवदूत' या बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. या इंजिनामुळे डिझेल विकत घेण्यासाठी खर्च होणारे परकीय चलन वाचेल तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी देखील याचा खूप मोठा उपयोग होईल', असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
यासाठी होणार नवदूतचा वापर
हे 'नवदूत' इंजिन, शंटिंग प्रकारातले आहे. याचा उपयोग एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी होणार नाही. यार्डमधून ट्रेन स्टेशनवर आणण्यासाठी आणि स्टेशनवरून रिकाम्या ट्रेन यार्डमध्ये नेण्यासाठी याचा उपयोग होईल. या कामासाठी सध्या डब्ल्यू डी एस 6, डब्ल्यू डी एस 6 AD अशा डिझेलवर चालणाऱ्या इंजिनांचा उपयोग होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. मात्र या नवीन इंजिनामध्ये उच्च क्षमता असलेल्या बॅटरीचा वापर केल्याने डिझेल खर्च न होता तसेच जिथे विद्युत पुरवठा नाही अशा रेल्वे मार्गांवर देखील या इंजिनाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे डिझेल आणि वीज या दोन्हीची बचत होईल.
इंजिनाची क्षमता 1200 हॉर्सपॉवर
पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागातील, कटनी इलेक्ट्रिक लोको शेड मध्ये, इलेक्ट्रिक इंजिनियर्सने या इंजिनाची निर्मिती केली आहे. या इंजिनाची क्षमता 1200 हॉर्सपॉवर आहे. त्याचे वजन 180 टन इतके असून त्याची लांबी 35 मीटर इतकी आहे. इंजिनाचा जास्तीत जास्त वेग 100 किलोमीटर प्रतितास असून तो 120 किलोमीटर प्रति तास इतका वाढवण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर हे इंजिन पूर्णतः एसी ट्रॅक्शन वर चालणारे आहे. 'नवदूत' ची चाचणी यशस्वी झाली असली तरी अश्याच प्रकारचे आणखीन एक इंजिन कोटा इथे देखील बनवण्यात येत आहे. या नवीन इंजिनांमुळे रेल्वेच्या डिझेल जळण्याने होणारे प्रदुषण तसेच वीज निर्मिती साठी होणारा खर्च भविष्यात कमी होईल याबाबत शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement