एक्स्प्लोर

खड्ड्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधींचा खर्च, पण परिस्थिती जैसे थे; 'आप'ची मुंबईत 'आय लव्ह खड्डा' मोहीम

Mumbai Potholes : मुंबईकरांच्या कराचा पैसा खड्ड्यात जातोय, असा आरोप करत आम आदमी पार्टीने संपूर्ण मुंबईत 'आय लव्ह खड्डा' मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.

मुंबई : नेमेची येतो पावसाळा, नेमेची पडतात खड्डे अशी अवस्था आता संपूर्ण मुंबईची झाली आहे. राज्य शासन, महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी हा रस्त्यांच्या डागडुजीसाठी खर्च करत असतात, तरीही रस्त्यांवरील खड्डे (Potholes) 'जैसे थे' असून ही गंभीरबाब आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या कराचा पैसा खड्ड्यात जातोय, असा आरोप करत आम आदमी पार्टीने (Aam Adami Party) संपूर्ण मुंबईत 'आय लव्ह खड्डा' (I Love Khadda) मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.

शहरातील खड्डयांच्या समस्यांबाबत मुंबई महानगरपालिकेचा (Mumbai Municipal Corporation) दावा किती फोल आहे, हे दाखवण्याकरता आम आदमी पार्टीने मुंबईभर 'आय लव्ह खड्डा' मोहीम राबवली. संदर्भात आम आदमी पार्टीने फोर्ट येथे कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना गोपाल झवेरी म्हणाले की, 'आय लव्ह खड्डा' मोहीम राबवत असताना कफ परेड, कुलाबा, वाकोला, चेंबूर, खार, जोगेश्वरी पश्चिम, भांडुप, अंधेरी पश्चिम, चर्चगेट, बोरीवली, मालाड, गोरेगाव आणि मानखुर्द यांसारख्या वैविध्यपूर्ण भागात खड्डे दिसून आले.

गेल्या 24 वर्षात मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्त्यांवर 29,000 कोटी रुपये खर्च केले असून, मुंबईतील फक्त 800 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. यासोबतच कंत्राटदारांच्या देखरेखीच्या अभावामुळे खड्डे हे मुंबईतील रस्त्यांचे कायमस्वरुपी ठिकाण बनले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन मृत्यूही ओढवला आहे. 2014 ते 2019 या कालावधीत 150 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, "मुंबईतील खड्ड्यांमुळे अतिरेकी हल्ल्यापेक्षाही जास्त मृत्यू होतात," अशी टीका गोपाल झवेरी यांनी यावेळी केली. 

खड्डे आणि मुंबई महानगपालिका हे मुंबईतील गुन्ह्यातील सर्वात प्रसिद्ध भागीदार बनले आहेत. त्यांच्या परिसरातील खड्ड्यांची पाहणी करताना, आपच्या स्वयंसेवकांनी आणि नेत्यांनी एका दिवसात संपूर्ण शहरात खड्डेच चिन्हांकित केले आहे. मुंबईच्या रस्त्यांची परिस्थिती भयाण असून मुंबईचा सामान्य माणूस यातून जात आहे, अशी खंत आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास म्हणाले.

"हे अगदी स्पष्ट आहे की महानगरपालिकेला आपले काम करण्याऐवजी केवळ पॉटहोल ट्रॅकिंग ॲप आणि हेल्पलाईनसारख्या प्रसिद्धी स्टंटमध्ये स्वारस्य आहे. शहराची किंमत केवळ मुंबईकरांच्या उद्ध्वस्त होण्यावर नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जीवनात निदर्शनास आणल्याप्रमाणे आहे. महानगरपालिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांना मुंबईकरांच्या जीवनाची फारशी पर्वा नाही, अशी टीका आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष द्विजेंद्र तिवारी यांनी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget