Mumbai-Pune Express Accident : ब्रेक निकामी झाल्यानं ट्रकची दोन वाहनांना धडक; मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 गंभीर
Accident News : मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण गंभीर जखमी आहेत.
![Mumbai-Pune Express Accident : ब्रेक निकामी झाल्यानं ट्रकची दोन वाहनांना धडक; मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 गंभीर Mumbai Pune Expressway Accident near Khopoli Truck collides with two vehicles 3 died 8 injured Marathi News Mumbai-Pune Express Accident : ब्रेक निकामी झाल्यानं ट्रकची दोन वाहनांना धडक; मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 गंभीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/10/4403c799105d4ff632208c4dd4a98f7d171531144578188_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai-Pune Express Accident : मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai - Pune Expressway) खोपोलीजवळ (Khopoli) भीषण अपघात (Accident News) झाला आहे. ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकनं समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर आठजण जखमी झाले आहेत. पुण्याहून (Pune News) मुंबईच्या (Mumbai News) दिशेनं येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला, अपघातातील जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकनं पुढे असलेल्या कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका ओमीनी कारला धडक दिली. ट्रकनं दिलेल्या धडकेनं भीषण अपघात झाला.
ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, ओमनी कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, ओमनीमधील 3 जण जखमी झाले आहेत. तर या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच, ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत. ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली, त्यातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू करुन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आलं. तसेच, अपघातग्रस्त वाहनं एक्सप्रेसवे वरुन हटवून वाहतूकही सुरळीत करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)