एक्स्प्लोर

Sanjay Pandey : महाराष्ट्र सत्तांतराच्या दिशेने... राजकीय वादळाच्या दिवशीच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची निवृत्ती

Sanjay Pandey : पांडे यांच्यावर महाविकासआघाडी सरकार काळात अनेक आरोप विरोधकांकडून  झाले. आता शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sanjay Pande : महाविकास आघाडीसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे. त्याचबरोबर  मुंबई पोलीस आयुक्तांसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे  (Sanjay Pande)  उद्या निवृत्त होणार आहे.  बहुमत सिद्ध करता आले नाही, तर महाविकासआघाडी सरकारचा उद्या शेवटचा दिवस असणार  आणि त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा ही उद्या शेवटचा दिवस आहे.  

मुंबई पोलीस आयुक्त उद्या 30  जून रोजी संजय पांडे निवृत्त होणार आहेत. पांडे यांच्यावर महाविकासआघाडी सरकार काळात अनेक आरोप विरोधकांकडून  झाले. आता शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  त्यातच उद्या बहुमत चाचणी होणार, त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे.  उद्याच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झालेत. पोलिसांनी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावलीए. तर दुसरीकडे दोन हजार सीआरपीएफचे जवान तीन विमानांनी मुंबईत दाखल झालेत

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे  शेवटच्या दिवशी महत्त्वाची भूमिका बजावतील आणि निरोप घेतील.  मग पुढे मुंबई पोलीस आयुक्तपदी कोण येणार ?  आयुक्तपदाचा चार्ज कोणाला मिळणार? याची उत्सुकता आहे.  नवीन सरकारबरोबरच नवीन मुंबई पोलीस आयुक्त मिळणार का ? हे  येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे.  

संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द

- आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण

- 1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी

- सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात

- मग मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले

- 1992 मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना

- 1992-93 दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात आहे 
 
- मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशन मिळून झोन 8 बनवलं, याचे पहिले डीसीपी संजय पांडे बनले. जवळपास तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला

- 1993 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दादागिरीला लगाम लावला.

- 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला
 
- 1997 इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला.

- 1998 मध्ये पुढील शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

- 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते

- 2001 मध्ये  राजीनामा दिला, परंतु तो मंजूर केला नाही, प्रकरण कोर्टात गेलं.

- 2005 मध्ये सेवेत पुन्हा आले आणि कारकीर्दीतील 20 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण ती पूर्ण झाली नाही.

- कोर्टातील लढ्यानंतर 2011 मध्ये पुन्हे सेवेत रुजू झाले.

- 2014-15 लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली.

- 2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले आणि याच पदावर राहून महासंचालकही झाले.

- अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांना नियुक्ती दिली. तर संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत पाठवलं.

- 9 एप्रिल रोजी संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget