Mumbai Crime : गतिमंद मुलीवर तिघांचा बलात्कार; आरोपी अल्पवयीन, बालसुधारगृहात रवानगी
Mumbai Crime News: बलात्काराच्या घटनेनं मुंबई हादरली. गतिमंद मुलीवर तिघांचा बलात्कार. पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून तिघांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.
Mumbai Crime News: पुन्हा एकदा बलात्काराच्या (Rape Case) घटनेने मुंबई (Mumbai News) हादरली आहे. मुंबईतील (Mumbai) घाटकोपरमध्ये (Ghatkopar) एका गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच, तिघांचीही रवानगी बालसुधारगृहात (Bal Sudhar Gruha) करण्यात आली आहे. दरम्यान, तिघांनीही बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून पीडितेच्या भावाने पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
शौचालयात अत्याचार, व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर
पीडित तरुणी घाटकोपर (Ghatkopar News) परिसरात राहते. ही तरुणी गतिमंद असून ती शौचासाठी गेली होती. त्यावेळी तिघांनीही तिला जबरदस्तीने शौचालयाच्या आतमध्ये नेलं आहे. एका आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तर दुसऱ्या आरोपीने व्हिडीओ शूट केला आणि त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला. काही दिवसांनी हाच व्हिडीओ पीडितेच्या भावाने पाहिला आणि आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांची पोलिसात धाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर परिसरात राहणारी गतिमंद मुलगी शौचाला सार्वजनिक शौचालयात जात होती. त्यावेळी तिघांनीही तिला शौचालयात ओढून नेलं. तिच्या तिच्यावर अत्याचार केले. तिघांपैकी एका आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. तर इतर दोघांनी या कृत्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडितेने तिच्या कुटुंबीयांना याप्रकरणी माहिती दिली होती. परंतु, कुटुंबियांनी यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नाही. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पीडितेच्या भावाने दुसऱ्या दिवशी हा व्हिडीओ पाहिला आणि वडिलांना त्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
तीन अल्पवयीन आरोपींची डोंगरीतील बालसुधारगृहात रवानगी
या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भादंविच्या कलम 376, 376 (जे) (एल), 323, 500, 34 आणि पोक्सो कलम 4 आणि कलम 66 (ई) 67 (बी) अन्वये गुन्हा नोंदवून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्यानं तिघांचीही रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा