एक्स्प्लोर

खाजगी 'स्कूल व्हॅन्स' वर सरसकट बंदी शक्य नाही : हायकोर्ट

कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात पालकांनी आपल्या घरातूनच केली पाहिजे, अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं.

मुंबई : कायदा मोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायद्याची माहिती असते, असं स्पष्ट करत हायकोर्टानं बेकायदेशीर स्कूल व्हॅन्समधून विद्यार्थ्यांना पाठवणं बंद करावं, असं बजावलं. कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात पालकांनी आपल्या घरातूनच केली पाहिजे, अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं. राज्यभरातील एक लाख आठ हजार 716 ही एकूण शाळांची संख्या असून स्कूल बस आणि स्कूल व्हॅन्सची संख्या ही निव्वळ 25 हजार असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. तर सुमारे 90 हजार शाळांमध्ये पालक शिक्षक संघटना कार्यरत आहेत. खाजगी स्कूल व्हॅन्स सरसकट बंद करणं व्यवहार्य ठरणार नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची गैरसोय होईल. असं मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी याचिकाकर्त्यांना समज दिली. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपायांची पूर्तता आणि अंमलबाजवणी करणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. आपली मुलं स्कूल बसने नीट शाळेत पोहचली की नाहीत, यावर पालकांनीही लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. तसेच शाळेनंही शाळा भरली की मेन गेट बंद करणं योग्य नाही, मुलं शाळेत कशी येतात? याकडेही त्यांनी लक्ष द्यावं. रस्त्यावर उतरुन शाळकरी मुलांची वाहतूक करणारं प्रत्येक वाहन तपासणं करणं प्रशासनाला शक्य होणार नाही असं हायकोर्टानं म्हटलं. 'पीटीए युनायटेड फोरम’ने केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावण सुरु आहे. राज्यभरात एकूण स्कूल व्हॅन्स किती? आणि त्यापैकी किती व्हॅन्सना परमिट दिलेले आहेत, याची माहिती सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले. तसेच या संदर्भात नियम काय आहेत? त्याचीही माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. केंद्र सरकारच्या स्कूल बसवरील नियमावलीनुसार राज्य सरकारने आपली नियमावली, साल 2011 मध्ये तयार केली आहे. त्यानुसार बारा आसनांपेक्षा कमी वाहनांना शाळकरी मुलांना वाहून नेण्याची परवानगीच नाही. तसेच प्रत्येक स्कूल बसला शाळेसोबत करार करणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांचं पालन होतं की नाही, हे राज्य सरकारकडून काटेकोरपणे पाहिलेच जात नाही. यासंदर्भात प्रत्येक शाळेत वाहतूक समिती असणे बंधनकारक असूनही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही, असा आरोप याचिकार्त्यांच्या वकिलांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget