(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CoronaVirus | परदेशातून हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांसाठी प्रशासनाची सुधारित कार्यपद्धती
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रत्येक गोष्टीचा अतिशय बारकाव्यानं विचार करत प्रशासन आता काही कठोर आणि महत्त्वाची पावलं उचलायला लागलं आहे
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रत्येक गोष्टीचा अतिशय बारकाव्यानं विचार करत प्रशासन आता काही कठोर आणि महत्त्वाची पावलं उचलायला लागलं आहे. यामध्येच मुंबईत हवाई मार्गानं येणाऱ्या प्रवाशांसाठीही ठराविक कार्यपद्धती पालिकेकडून जारी करण्यात आली होती. ज्यामध्ये आता सुधारणा करण्यात आल्या असून, ही सुधारित कार्यपद्धती तातडीनं लागू करण्यात येण्याचे आदेश पालिता आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या आदेशांनुसार युरोप, युके, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल या देशांतून शहरात येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात रहाणं सक्तिचं असेल. यामध्ये मुंबई महानगरपालिकेडून नेमून दिलेल्या हॉटेल्समध्ये या प्रवाशांना राहणं बंधनकारक असेल असं सांगण्यात आलं होतं. पण, काही प्रवाशांनी या विलगीकरणातून पळवाटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळं आता पालिकेनं नियमांमध्ये काही सुधारणा करत त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला आहे.
सुधारित कार्यपद्धती खालीलप्रमाणे -
- प्रवाशांसाठी विमानतळावर असणाऱ्या आरोग्य तपाणसणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथवा पालिकेच्या कर्मचारी पथकानं प्रवाशांच्या माहिती तपशीलासह त्यांची एक यादी तयार करावी. ज्यामुळं प्रभागानुसार असणाऱ्या हॉटेल्ससाठी ही वापरात आणली जाऊ शकेल.
- ही यादी विभाग सहाय्यक आयुक्त आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवणं गरजेचं असेल.
Corona vaccination : देशात लसीकरण मोहिमेला वेग; आतापर्यंत देण्यात आले 8.40 कोटींहून अधिक लसींचे डोस
- विमानतळावरुन या प्रवाशांना हॉटेलवर नेण्याची जबाबदारी ही पालिकेनं नेमलेल्या कर्मचारी पथकावर असेल. यामध्ये बेस्ट बसचा वापर करण्यात येणार असून, बेस्ट बस वाहनचालकाला प्रवाशांची यादी देणं इथं गरजेचं असेल.
- पुढं बेस्ट बस चालकावर या प्रवाशांना निर्धारित हॉटेलपर्यंत नेण्याची जबाबदारी असेल. त्यांनीच प्रवासी हॉटेलवर पोहोचल्याची पावतीही मिळवणं गरजेचं आहे. ही पावती विमानतळावर असणाऱ्या अधिकाऱ्याकडे चालकानं सुपूर्द करावी.
- प्रवासी पोहोचल्याची पावती मिळाल्यानंतर विमानतळावर असणाऱ्या अधिकाऱ्यानं पुन्हा एकदा हे प्रवासी हॉटेलवर पोहोचले आहेत ना, याची फेरपडताळणी करुन घ्यावी.
- विभाग कार्यालय सहाय्यक आयुक्तांनी आपआपल्या विभागात असणाऱ्या संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये असणारे प्रवासी प्रत्यक्षात तेथे आहेत ना, याबाबतची खातरजमा करावी.
- प्रवाशांच्या विलगीकरणादरम्यान, त्यांची दोनदा तपासणी केली जाणं आवश्यक असेल.
- विलगीकरणात असतेवेळी कोणत्याही नियमांचं उल्लंघन झाल्यास, संबंधित अधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारवाई करणं अपेक्षित.
- नियुक्त आयुक्तांनी त्यांना दिलेल्या कामाचा नियमित आढावा घेऊन विलगीकरणातील प्रवाशांचा तपासणी अहवाल मिळवून नियमितपणे त्याची प्रत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) आणि परिमंडळीय उप आयुक्त यांच्यापर्यंत पोहोचवावी.
मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेली ही सुधारित कार्यपद्धती तातडीनं लागू करण्यात यावी आणि यामध्ये सर्वांनीच पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.