Corona vaccination : देशात लसीकरण मोहिमेला वेग; आतापर्यंत देण्यात आले 8.40 कोटींहून अधिक लसींचे डोस
कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोनावरील प्रभावी लसींचे 8.40 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 लाखांच्या पार पोहोचली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत एकूण तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीचा डोस देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 8 कोटी 40 लाखांहून अधिक कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत.
आतापर्यंत 8.40 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले
कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोनावरील प्रभावी लसींचे 8.40 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 89 लाख 60 हजार 966 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 53 लाख 77 हजार 11 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत फ्रंट लाइन 97 लाख 30 हजार 304 कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 42 लाख 68 हजार 788 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये लसीकरणाचं काम
सध्या भारतात 16 जानेवारी 2021 पासून सुरु करण्यात आलेलं कोरोना लसीकरणाची मोहिम तिसऱ्या टप्प्यांत पोहोचली आहे. देशभरात आतापर्यंत 8 कोटी 40 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीकरणाचं काम केलं जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आलं होतं.
दरम्यान, देशभरात कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 27 लाख 99 हजारांवर पोहोचला आहे. आतापर्यंत 1 लाख 66 हजार 208 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात जवळपास 1 कोटी 17 लाख 89 हजार 759 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच वर्तमान काळात कोरोना अॅक्टिव रुग्णांचा आकडा 8 लाख 43 हजारांच्या पार पोहोचला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :