एक्स्प्लोर
Advertisement
आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित, येत्या 17 फेब्रुवारीला भरणार यात्रा
दरवर्षी यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. यात्रेची तारीख निश्चित झाल्याने चाकरमानी आणि बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असलेल्या भाविकामध्ये तिकीट बुकिंगची लगबग सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री भराडीदेवीचं मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या 15 कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानुसार 17 फेब्रुवारी 2020 रोजी यंदाची यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबीयांची मंदिरात बैठक झाल्यानंतर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
दरवर्षी यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. यात्रेची तारीख निश्चित झाल्याने चाकरमानी आणि बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असलेल्या भाविकामध्ये तिकीट बुकिंगची लगबग सुरू झाली आहे. सर्वसामान्यांसह राजकारणी नेते मंडळीही भराडी देवीच्या दर्शनाला आवर्जून उपस्थिती लावतात.
कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला येणाऱ्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी. मात्र, गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला मोठं स्वरूप आलं आहे. अनेकजण मोठ्या श्रद्धेने या जत्रेला येतात.
अशी ठरते भराडी देवीच्या जत्रेची तारीख!
कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र श्री भराडीदेवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे.
दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात आणि डुकराच्या शिकारीचा (पारध) दिवस ठरवतात. देवीला कौल लावला जातो. गावकरी जंगलात घुसतात आणि डुकराची शिकार वाजतगाजत घेऊनच परततात. त्यानंतर काही दिवसांनी जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी पुन्हा डाळप स्वारी होते आणि कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित होतो.
सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जत्रेची तारीख. जत्रेची तारीख इतरांना कळवणं हा आगळा अनुभव फक्त या यात्रेतच पहायला मिळतो. एसटीवर, रिक्षावर, सुमोवर, ग्रामपंचायतीच्या फळ्यावर जिथे जागा मिळेल तिथे प्रत्येक ठिकाणी खडूचा रंग उठतो आणि उमटली जाते ती जत्रेची तारीख.
भराडी देवीच्या जत्रेला देश-विदेशातून भाविक
आंगणेवाडी ही मालवण तालुक्यातील मसूरे गावची एक छोटीशी वाडी. पण या वाडीतील भराडी देवीची वार्षिक जत्रेसाठी आता मुंबई-पुण्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून मालवणी माणूस आवर्जून हजेरी लावतो. जत्रेची तारीख जाहीर झाली की, सिंधुदुर्गातील बहुतांश रिक्षांच्या मागे आंगणेवाडी जत्रेची तारीख लिहली जाते. एसटीमध्येही खडूने जत्रेची तारीख लिहिली जाते. 20-25 वर्षांपूर्वी ही जत्रा काही हजारांच्या घरात होती. आता मात्र ती लाखांची झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement