Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर
अमरावती जिल्ह्यात काही संघटना त्रिशूल वाटत आहे. मात्र हा त्रिशूल नसून ही गुप्ती असल्याचा काँग्रेस नेत्या आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय. तर या आरोंपाना भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे
Amravati News: अमरावती जिल्ह्यात काही संघटना त्रिशूल वाटत आहे. मात्र हा त्रिशूल नसून ही गुप्ती आहे. दरम्यान भविष्यात एखादी घटना घडली आणि त्याला हिंसक वळण लागले तर याचं उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे. असा आरोप करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी अमरावती जिल्ह्यासह राज्याला याने हिंसक वळण लागेल, अशी भीती व्यक्त केली आहे.
दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोंपाना भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी अनिल बोंडे म्हणाले की, हे दुर्देव आहे की यशोमती ताईंनी गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. यांना मुसलमानांच्या घरातले सत्तुर आणि कोयते दिसत नाही का? धार्मिक विधी म्हणून कोणी त्रिशूल वाटत असेल तर खरोखर द्यायला पहिजे. हिंदूंच्या घरात साप मारायला साधी काठी नसते. त्यामुळे स्व रक्षणासाठी जर घरात त्रिशूल असेल तर ते आवश्यक असल्याचा शेरा ही भाजप खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी दिला आहे.
....तर महादेवाच्या मंदिरावर गुन्हे दाखल करा- अनिल बोंडे
राजकारणासाठी एवढं लांगूलचालन करायचं की अल्पसंख्याक लोकांमध्ये भीती निर्माण करायची. एखादया जवळ त्रिशूल सापडलं तर त्यांनी यशोमती ठाकूर यांनी सांगावं. दरम्यान कुठं त्रिशूल दिसलं, किंवा मंदिरात त्रिशूल गाडलेले दिसले तर शंकर मंदिरावर गुन्हे दाखल करा, असे पोलिसांना सांगावे, असा मिश्किल टोला ही खासदार अनिल बोंडे यांनी लगावला आहे. भाजपचं सरकार आहे म्हणूनच बांगलादेशींना खदडून काढण्याची हिम्मत आहे. ज्यांनी ज्यांनी आश्रय दिल त्यांनाही जेलात टाकलं पाहिजे. त्यामुळे आता फक्त काँग्रेसवाल्यांनी आणि यशोमती ताईंनी ओरडू नये, असेही ते म्हणाले
नेमकं काय म्हणाल्या होत्या यशोमती ठाकूर?
अमरावती जिल्ह्यात काही संघटना त्रिशूल वाटत आहे. मात्र हा त्रिशूल नसून ही गुप्ती आहे. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहीजे. आम्ही याची तक्रार पोलीसात अद्याप केली नाही, पण पोलीसांनी सुमोटो दाखल केलं पाहिजे. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी त्रिशूल सारखे दिसणाऱ्या शस्त्रचे फोटो ही दाखवले आहे. दरम्यान, एकीजडे बांगलादेशी घुसले म्हणतात पण तुमचेचे सरकार आहे मग हे इकडे आले कसे? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पोलीसांनी हे गुप्ती (शस्त्र) कुठं कुठं वाटल्या याचा शोध घेतला पाहिजे. हे त्रिशूल नसून ही गुप्ती आहे.
अमरावती जिल्ह्याला आणि राज्याला याने हिंसक वळण लागेल. अशी भीतीही काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावेळी बोलून दाखवली. तर महायुती लोकसभेची मतदार यादी नाकारतात करण विधानसभेच्या यादीत लाखो बोगस नावे समाविष्ट करण्यात आले आहे. आम्ही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या बाबत याचिका दाखल केली आहे. लोकशाहीला मारण्यासाठी हे सगळं काम सुरू आहे. आम्हाला तुमची साथ हवी आहे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केलंय.
हे ही वाचा