Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole : भाजपचे मोठे नेते म्हणतात, मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आले, जर बांगलादेशी आले, तर 11 वर्षांचे केंद्र सरकार कमजोर असल्याचा घणाघात पटोले यांनी केला.
Nana Patole : महाराष्ट्र विधासभा निवडणुकीत 66.65 टक्के टक्के मतदान झाले हे निवडणूक आयोग असे सांगता असतांना अतिरिक्त 60 लाख मते आली कुठून? हे बांगलादेशी मतदार होते का? असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की 9 कोटी 54 लाख यादी फायनल केली. एकूण मतदानात 9 कोटी 70 लाख 25 हजार झाले. 6 कोटी 40 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावल्याची आकडेवारी जाहीर केली, मग 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? बांग्लादेशींना मोदी सरकारने आणले का? असा गंभीर आरोप पटोले यांनी केला. भाजपचे मोठे नेते म्हणतात, मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आले, जर बांगलादेशी आले, तर 11 वर्षांचे केंद्र सरकार कमजोर असल्याचा घणाघात पटोले यांनी केला.
फडणवीस निवडणूक आयोगाची बाजू मांडत होते
नाना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी जास्त आहे. आम्ही ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतलेला नाही. नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस निवडणूक आयोगाची बाजू मांडत होते. स्क्रिप्ट कोणी तयार करून दिली होती? अशी विचारणा पटोले यांनी केली. मतदारांचे मत सुरक्षित नाही, राज्यात जिल्हाधिकारी, तहसीलदारांना काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या राज्याची लोकसंख्या नाही त्यापेक्षा जास्त मतदार
राज्यात गेल्या 5 वर्षात 50 लाख आणि 6 महिन्यात 46 लाख मतदार वाढले. निवडणूक आयोगाने वेबसाईटमधून हा डेटा डिलीट केला आहे. आम्ही ही आकडेवारी गोळा केली आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहचण्याचे काम सुरू केल्याचे ते म्हणाले. काँग्रेस विचाराने या देशाला उभे केलं असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही स्मार्ट आहोत, ज्या लोकांना लोकशाही वाचवायची आहे त्यांनी सोबत यावे. आज त्यांची वेळ आहे, उद्या आमची येईल. हे फोटोसेशनसाठी नाही. आपल्या राज्याची लोकसंख्या नाही त्यापेक्षा जास्त मतदार असल्याचे ते म्हणाले.
दाओसमध्ये जाऊन गुंतवणूक आणण्याची गरज नव्हती
नाना पटोले म्हणाले की, दाओसमध्ये जाऊन गुंतवणूक आणण्याची गरज नव्हती. काही कंपनी विदेशी असल्या, तरी इतर सर्व महाराष्ट्रातील होत्या. बिअर आणि दारू बनवणाऱ्या कंपन्या आणल्या, महाराष्ट्राला दारूराष्ट्र बनवायचे आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी आणलेलं इन्व्हेस्टमेंट कुठे गेली, किती रोजगार दिले? अशी विचारणा त्यांनी केली. लाखो कोटींची जमीन उद्योगाच्या नावावर नाममात्र किमतीवर देत आहेत, राज्य कर्जबाजारी असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य लुटू नका, राज्य सांभाळा, राज्य बरबाद करण्यासाठी नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या