एक्स्प्लोर

Blog : कॉन्सर्टचा YOLO FOMO!

गाणं म्हणजे, भजी तळण्याइतकी सोपी गोष्ट नक्कीच नाहीये,  खरंतर यंदा 'कोल्डप्ले'च्या कॉन्सर्टला Once in Lifetime Experience Opportunity म्हणत... 
बघता बघता जो तो तिकीटांच्या मागे लागलेला असताना अगदी मी सुद्धा माझ्या परीने 'कोल्डप्ले'च्या तिकिटांचा जुगाड होतो का यासाठी प्रयत्न केले,  लाख रुपयाचे दोन तिकिटं चालून आले. मात्र, मला काही जाता आलं नाही. तो भाग वेगळा!

अलीकडेच सनबर्नसारखे संगीत फेस्टिव्हल किंवा लोलापलूझा फेस्टिव्हल असो इथे येणारे इंटरनॅशनल, नॅशनल गायक, म्युजिशिअन यांना भारतात अक्षरश डोक्यावर घेतलं जातं आणि कॉन्सर्ट्सची हाइप होते. ही क्रेझ आपल्याकडेच आहे, अशातला भाग नाही, हे जगभर पसरलेलं आहे. याला 'फोमो' म्हणा किंवा 'योलो' चुकीचं ठरणार नाही.  

बर्‍याचदा! जसं कलाकार हा जन्मावा लागतो असं म्हणतात, तसंच रसिक हा देखील जन्मावाच लागतो असं म्हटल्यास फारसं वावगं ठरू नये! 
कारण परवाच मुंबईत झालेल्या 'कोल्डप्ले' च्या कॉन्सर्टमध्ये अशी देखील चर्चा झाली की, देशभरातून खिसे रिकामे करून दोन तासासाठी मुंबईत गोळा झालेल्या मंडळींना  'कोल्डप्ले'ची काही ठराविक गाणी सोडली तर इतर गाणी माहित देखील नव्हती, ना पाठ होती. तर अशा प्रसंगी उगाचच आपापल्या 'स्टेट्स' साठी काहीतरी अचाट कृत्य करून तर फोमो म्हणजे 'फिअर ऑफ मिसिंग आउट' किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर मागे राहण्याची भिती वाटू नये म्हणून बऱ्याच मंडळींचा ठरलेला खटाटोप असतो, तर  YOLO म्हणजे You only live once आपल्याला एकदाच आयुष्य मिळतंय, म्हणून तुम्ही आनंददायक किंवा रोमांचक अशा गोष्टी कराव्यात, जरी तो मूर्खपणा असेल किंवा किंचित धोकादायक गोष्टी असल्या तरीही. तुमचं आयुष्य धमाकेदार गोष्टींनी भरलेलं असावं, हे वाटणं आणि त्यात वेड्यासारख झोकून देणाऱ्यांचा विषय चर्चेचा ठरला आहे. त्यातच महाकुंभ मेळ्यातला IIT वाल्या बाबाने तर ज्यांच्या आयुष्यात काही घडत नाही त्यांना तर वेगळीच प्रेरणा देऊन ठेवलीय... बेफिकीर असण्यात, राहण्यात काहीच अडचण नाही. मात्र, तुमची काळजी तुमच्या जवळच्यांना वाटेल इथंवरचा वेडेपणा तरी करू नये... 

अलीकडेच Ed sheeran ते दिलजीत दोसांझ, एपी ढिल्लन अशा मंडळींची हवा आपल्या सर्वांना चांगलीच माहित आहे. खरंतर ही मंडळी त्यांच्या क्षेत्रात जबरदस्त काम करून जगप्रसिद्ध झालेली आहेत, त्यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे... भारतातली लाईव्ह इव्हेंट्सच्या मार्केटची उलाढाल पाहिली तर  तर २०२३ मध्ये जवळपास ८८ करोड, आणि २०२४ मध्ये हाच आकडा तब्बल १७ टक्क्यांनी वाढून १०७ करोड पर्यंत गेल्याचं पाहायला मिळतं आणि पुढही हा ग्राफ वाढतच जाणार आहे... जवळपास ५४.७ करोड लाईव्ह स्ट्रीम्सचा युजर आहे. जो लोकसंख्येच्या ३८ टक्के आहे, आणि हाच कदाचित लाईव्ह इव्हेंट्सकडे ओढला जातोय...  थोडं खोलात जायचं झालं तर... 

भारतातल्या कॉन्सर्ट्सचे तिकिटं महाग का होतायत?
तिकिटांचा काळाबाजार, झोल होतोय असा सूर नेहमीच ऐकायला मिळतो. मग अगदी IPL, क्रिकेट मॅचेस असोत किंवा मोठ्या स्टार्सचे कॉन्सर्ट असोत. सगळ्यांना कशी तिकिटं मिळू शकतात, हा बेसिक विचारही कोणाला येत नाही आणि थेट काळाबाजार घोषित केला जातो. जगप्रसिद्ध 'कोल्डप्ले' या म्युझिकल बँडच्या वर्ल्ड टूरचे भारतातील शो १८, १९ आणि २१ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत तर उर्वरित दोन शो अहमदाबादमध्ये होणार असल्याचं समजताच, 'कोल्डप्लेचे चाहत्यांचा आनंद गगनात मावेना. गेल्या वर्षी २२ सप्टेंबरला या शो'च्या तिकिटांची विक्री सुरु होताच, अवघ्या काही मिनिटांत ३ हजार, ४० हजार ते तब्बल ७ लाख पर्यंतचे तिकिट्स  विकले गेले. बुक झाले. या पलीकडे जवळपास १.३ करोड भारतीय या कॉन्सर्टचे तिकीट मिळवण्यासाठी रांगेत होते. हाच जर विचार केला तर, या दरम्यान तिकिटांची संख्या आणि उत्सुक असणाऱ्या चाहत्यांची संख्या जास्त असल्याने, डिमांड सप्लाय पाहिलं तर भारतातल्या कॉन्सर्ट्सचे तिकिटं महाग तर होणारच.  शिवाय अलीकडे कॉन्सर्ट्ससाठी मुंबई, दिल्ली आणि कोलकाताच नाही तर जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, चंदीगड, लखनौ, पुणे, आणि बेंगळुरू सारखी शहरं आपापली डोकी वर काढू लागली आहेत. अशा कॉन्सर्ट्स पाहण्यासाठी एकाच दिवशी एकाच वेळी एका शहरात गोळा होणार तर त्या शहराची चाल बिघडणारच ना..  

मध्यंतरी दिलजीत दोसांझने चंदीगडमध्ये झालेल्या कॉन्सर्ट्स म्हटलं की, "जोपर्यंत भारतातील कॉन्सर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नाही तोपर्यंत मी पुन्हा भारतात कॉन्सर्ट करणार नाही. भारतात लाईव्ह शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत." हे मलाही कबूल आहे की, एकीकडे चाहते त्यांचा तीन महिन्यांचा पगार दोन तासांसाठी खर्च करत असताना त्यांना मिळणाऱ्या सुविधा पर्यायी चांगल्या नसतात, अगदी नाटकांच्या थिएटरची परिस्थिती असो किंवा स्क्रिन्सची अडचणी असल्या तरी कालांतराने विकास तर होणारच. तुम्ही हयात असेपर्यंत तो विकास झाला तर तुमचं भाग्य. असो किंवा सरळ परदेशी जाऊनच हा अनुभव घ्या, त्यात काय वाईट आहे? आता भारत सरकारला अशा मोठ्या मार्केटकडे लक्ष देऊन परिस्थिती आणि सुविधा देण्यासाठी पुढे यावं लागेलच, कारण आता जवळपास ६०% जनता ही Gen Z आणि Millennials ची आहे, त्यांना खुश करायचं असेल तर अशाही 'योजना' यायलाच हव्यात!  

मात्र दर्शक, रसिक प्रेक्षकांचा YOLO आणि FOMO असा काही जुळून आलाय की, एकेकाळी 'अंथरून पाहून पाय पसरावे' सारख्या जुन्या कॉन्सेप्ट आजकाल  क्रेडिट कार्ड्सच्या जमान्यात राहिल्या नाहीतच. आपल्या आवडत्या गायकाचा कॉन्सर्ट असो आवडत्या प्लेअरची क्रिकेट, फुटबॉल मॅच असो किंवा आवडत्या कलाकाराच्या सिनेमा किंवा नाटकाचं तिकीट असो सर्व काही आपल्या आवाक्यात आहे, वाट्टेल तेवढे पैसे खर्च करा आणि हवा असलेला आनंद मिळवत राहा.
 
सर्व काही करताना आपल्यात दडलेला 'रसिक' म्हणजे 'शौकीन'ला जिवंत ठेवताना इतर सगळे करत आहेत, म्हणून तुम्हालाही तेच करायचंय या फंद्यात पडण्यापेक्षा किंवा तयार झालेले असे कित्येक फोमो असतात, ते इतर सगळे करत आहेत. म्हणून न करता, खरंच तुमच्या आतून ते आलंय का? ती आवड छंद त्यात तुमचं रमून जाणं कितपत खरं आहे? याचा ठाव घेणं गरजेचं आहे. हल्ली क्लबला जाणं लाऊड संगीतावर धुंद होणं अगदी चहाच्या टपरीवर जाणं एवढं कॅज्युअल झालंय, की आपल्यातलं वेगळेपण शोधताना सर्व काही सोशल स्टेटससाठी आहे का? किंवा मिळणारा दोन तासाचा अनुभव हा नक्की खरंच वर्थ आहे का? याचा विचार करायला हवा. प्रत्येकाचं म्हणणं आणि उत्तरं वेगळी असू शकतात ती आपापली शोधावी!

विनीत वैद्य यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग 

'X' फॅक्टर...
मृत्यूस कारण की...
पैश्याच सोंग...
दोन दगडांवर पाय...
झेपावे मिलियन्सकडे...
डिजिटल डिस्टन्स

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
Sanjay Raut : फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!
फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट, बिर्याणी अन् मोबाईलमध्ये अनलिमिटेड टॉकटाईमTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 25 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Kolhapur VIDEO : प्रशांत कोरटकराला घेऊन पोलीस कोल्हापुरात, आज सुनावणी होणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
Sanjay Raut : फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!
फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं, पण...; राऊतांनी सगळंच सांगितलं!
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
Beed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट; बिर्याणी, नातेवाईकांच्या भेटीगाठी अन् मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम
खोक्या भाईसाठी बीड पोलिसांचा बिर्याणीचा सुग्रास बेत, मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाईम अन् भेटीगाठी
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
Embed widget