चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार आहे. राज्यातील 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
Supreme Court on Local Body Election : महाराष्ट्राच्या राजकीय साठमारीत गेल्या चार तारीख पे तारीख झाल्याने जिल्हा परिषदा आणि मनपांच्या निवडणुका रखडल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून फक्त तारीख पे तारीख झाल्याने सुप्रीम कोर्टात अजूनही तोडगा निघालेला नाही. अशा स्थितीत आता पुढील सुनावणीची तारीख सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारीला असून निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर निवडणुकांचे भविष्य असणार आहे. यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार आहे. राज्यातील 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
सगळा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आदींच्या निवडणुका कधी कोरोनाच्या संसर्गाचे कारण देत, तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतल्या गेल्या नाहीत. ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही यावरसुद्धा बराच गदारोळ झाला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर 2020 पासून राज्यात कुठे एकदा तर कुठे दोनदा, तीनदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात आली होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी तर तीन वेळा करण्यात आली. आज राज्यात एकही महानगरपालिका, जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधी नाहीत, तेथील सगळा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे. लोकसभेसह विधानसभा निवडणुकाही संपल्या असून स्थिर सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे महायुती सरकार लवकरात लवकर या निवडणुका घेईल, अशी अपेक्षा आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे सध्या चांगले वातावरण आहे.
कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित?
महापालिका
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी या पालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
जिल्हा परिषद
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा
इतर महत्वाच्या बातम्या