एक्स्प्लोर

ST Bus Fare Hike : एसटीचा प्रवास महागला, मध्यरात्रीपासून भाडे वाढ लागू होणार, किती किलोमीटरला किती भाडे वाढले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

ST Bus Fare Hike : एसटीचा प्रवास महागला, मध्यरात्रीपासून भाडे वाढ लागू होणार, किती किलोमीटरला किती भाडे वाढले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

ST Bus Fare Hike ,मुंबई, दि. 24 : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहे.

वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आला. मागील भाडेवाढ दिनांक २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी करण्यात आली होती.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या  तरतूदीनुसार शासनाने राज्य परिवहन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांची २७६ वी बैठक  अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी झाली. सदर बैठकिस राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) व  परिवहन आयुक्त उपस्थित होते.

या बैठकीत  महामंडळाच्या पर्यावरणपूरक नविन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेस टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी  पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरी प्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे  रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास  नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी कळविले आहे.

अशी आहे भाडेवाढ

सेवेचा प्रकार :  साधी बस - सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये.

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Prakashrao Abitkar : गर्भलिंग निदान सुरु असल्याची टीप देणाऱ्या खबरींना एका लाखाचं बक्षीस देणार, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

 

 

 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या बेईमानीमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत, नाना पटोलेंची जहरी टीका
निवडणूक आयोगाच्या बेईमानीमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत, नाना पटोलेंची जहरी टीका
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
धक्कादायक! पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं वैतरणा धरणात दोन तरुण बुडाले, शोधकार्य सुरु 
धक्कादायक! पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं वैतरणा धरणात दोन तरुण बुडाले, शोधकार्य सुरु 
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
Embed widget